Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

पंढरपुरातून (Pandharpur) मुलाच्या लग्नाच्या वरातीत बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुभाष देवमारे असे मयत पित्याचे नाव आहे. सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा लग्न सोहळा (Marriage Celebration) आयोजित केला होता. दरम्यान रात्री डॉल्बीच्या (Dolby) दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती. नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वधू पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखले केले पंरतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Ahmednagar Accident: धक्कादायक,दर्गा दर्शनासाठी जात असताना कारचा अपघात, तिघांचा मृत्यू)

डॉल्बिच्या कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे मृत्यू सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सध्या होत आहे. लग्नाच्या वरातीमध्ये सर्रासपणे डॉल्बीचा वापर केला जात आहे. डॉल्बीच्या दणदणाटामुळे यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. नियमापेक्षा जास्त डेसिबल आवाज सोडणाऱ्या डॉल्बीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.