Ahmednagar Accident: धक्कादायक,दर्गा दर्शनासाठी जात असताना कारचा अपघात, तिघांचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

Ahmednagar Accident: अमहमदनगर जिल्ह्यात दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एक कार ठाणातून कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी जात होते. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घार गाव परिसरात दौंड महामार्गावर दोन गाड्यांच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे. घटनेत झायलो कारचा अपघात झाला आहे. या कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच हा घात झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-  जमशेदपूर येथे अनियंत्रित कारचा भीषण घात, 6 जणांचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, घारगाव परिसरात दौंड महामार्गावर दोन गाड्यांची टक्कर झाली आणि अपघात झाला या अपघात तिघांनी आपले प्राण गमावले. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. ठाण्यातील शेख कुटुंब हे बेलवंडी फाटा मार्गे कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शन देण्यासाठी जात होते. ओव्हरटेकच्या नादात समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक झाली. या भीषण धडकेत शेहबाज अजिज शेख याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची दोन मुले गाझी शेख, लुझेन शेत यांना उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

कारमध्ये इतर प्रवाशी जखमी झाले. या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.