Pakistani OTT Platform Ban: भारताची पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, केंद्र सरकारकडून पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्मवर बंदी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

भारताने यावेळी पाकिस्तानला डिडिटल माध्यमातून चांगलाचं धडा शिकवला आहे. क्रिकेट, सिनेमा आता ओटीटी प्लॉटफॉर्मवर देखील केंद्र सरकारने कारवाई केली आहे. किंबहुना भारतात आता पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्म बघता येणार नाही कार मोदी सरकारने पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्मवर बंदी आणली आहे. पाकिस्तानी ओटीटी प्लॅटफॉर्म Vidly TV ला भारतात बॅन केलं आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मसह Vidly TV ओटीटी ॲपच्या दोन मोबाइल ॲप्लिकेशन, चार सोशल मीडिया अकाउंट आणि एक स्मार्ट टीव्ही ॲपवर देखील बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान संतापला असला तरी पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्मवरील बंदीमागे मोठ कारस्थान दडलं आहे. हे एकल्यावर खरचं पाकिस्तान बरोबर हेच व्हायला हवं हीच भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात येईल.

 

पाकिस्तानी ओटीटी प्लॉटफॉर्म सेवक द कन्फेशन नावाची एक वेबसीरीज प्रदर्शित करण्यात आली. या वेबसिरीजचे एकुण तीन एपिसोड प्रदर्शित झाले आहेत. या वेबसिरिजच्या पहिल्या भागात २६/११ ला झालेल्या हल्ल्यावर आधारीत आहेत. तरी यांत भारत, भारत सरकार, भारतीय लष्कर कसं चुकीचं आहे. हे दाखवण्यात आलेलं आहे म्हणजेच झालेल्या प्रकारात भारतचं कसा दोषी आणि पाकिस्तान किती पिडीत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. (हे ही वाचा:- Indian Parliament Attack 2001: संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची 21 वर्षे; 45 मिनिटांच्या दहशतीने हादरला होता संपूर्ण देश, जाणून घ्या नक्की काय घडले)

 

तसेच या वेबसिरिजमध्ये अयोध्येत बाबरी मशीदचे विध्वंश, ग्राहम स्टेंप्स नावाच्या एका ईसाई मिशनरीची हत्या, मालेगाव स्फोट, समझौता एक्सप्रेस स्फोट, सतलुज यमुना लिंक संबंधित आंतरराज्यीय पाणी वाद दाखवण्यात आला आहे. ज्यात भारत सरकार देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा, संप्रभुता आणि अखंडतेसाठी हानीकारक असल्याचे दर्शवण्यात आलं आहे. भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या वेबसिरीजद्वारे केला गेला आहे तरी केंद्र सरकारकडून Vidly TV या ओटीटी प्लॉटफॉर्मसह सगळ्या सलग्न मोबाईल अप, सोशल मिडीया पेज आणि टीव्ही अपवर बंदी घालण्यात आली आहे.