कच्छ मध्ये भारतीय लष्कराने नष्ट केलं पाकिस्तानी ड्रोन
Line of Control | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

भारताने आज (26 फेब्रुवारी) पुलवामाच्या हल्ल्याच्या 12 व्या दिवशी पाकव्याप्त काश्मिरमध्ये (POK) जाऊन हल्ला केला आहे. एअर स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांचा खात्मा करण्यात भारताला यश आलं आहे. मात्र कुटनितीच्या राजकारणामध्ये आता भारतामध्ये आनंदाचं वातावरण असलं तरीही पाकिस्तान सरकार हादरल आहे. त्यांनी बदला घेण्यासाठी काही हालचाली सुरू केल्या आहे. आज सकाळी एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकच्या ड्रोन (Pakistan drone) नष्ट करण्यात आले. Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे

कच्छच्या (Kutch Border) सीमाभागावर पाकिस्तानचे ड्रोन संशयास्पद फिरत होते. भारतीय लष्कराला ही बातमी समजातच सकाळी 6.30 च्या सुमारास लष्काराने ते ड्रोन नष्ट केले आहे. सध्या पाकिस्तानामध्ये उच्च्चायुक्तांची बैठक सुरू आहे.

भारतामध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये रोष होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफ जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल असं म्हटलं होतं. त्यानंतर भारतीय लष्कर योग्य त्या मार्गाने, कधी, केव्हा, कसा बदला घ्यायचा याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार आज दहशतवादी हल्ल्याच्या बाराव्या दिवशी हवाई सेनेकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला.