पाकिस्तान (Pakistan) येथून भारतात (India) येण्यासाठी निघालेल्या रेल्वेला थांबवण्यात आले. यावेळी 200 शीख प्रवाशांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप पाकिस्तानकडून लावण्यात आला आहे. मात्र रेल्वेच्य प्रवेशासाठी पाठवण्यात आलेला प्रस्ताव व्यवस्थित नसल्याने त्यांना प्रवेश नाकारला असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
गुरु अर्जून देव यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या रेल्वेतून जवळजवळ 200 शीख नागरिक भारतात येणार असल्याने त्यांना व्हिसा सुद्धा देण्यात आला होता. मात्र भारताच्या सरकारने पाकिस्तानच्या रेल्वेला अडवण्यात आले असल्याचे ईटीपीबीचे प्रवक्ते आमीर हाश्मी यांनी सांगितले. मात्र प्रवाशांना भारतात प्रवेश का नकारला हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसल्याचा आरोप हाश्मी यांनी केला आहे.
(धावत्या ट्रेनमध्ये डॉक्टर मिळेना; TTE ने केली महिलेची सुखरुप प्रसुती)
या प्रकारामुळे भारताने दिलेल्या निर्णयाचा निषेध करत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पाकिस्तान मधील शीखांना भारतात प्रवेश नाकारणे हे निराशाजनक असल्याचे ही त्यांच्याकडून बोलले जात आहे. त्यामुळे हा मुद्दा सरकारी स्तरावर घेऊन जाणार असल्याचे हाश्मी यांनी म्हटले आहे.