Pahelgam Terror Attack | X

पहलगाम (Pahalgam) मधील पर्यटकांवर झालेला हल्ला हृद्य पिळवटून टाकणारा आहे. या हल्ल्यामध्ये 27 निष्पाण पर्यटक मारले गेले आहेत. या हल्ल्यानंतर काही तासांतच The Resistance Front ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांचे फोटोज देखील समोर आले आहेत. जम्मू कश्मीर मध्ये ऐन हंगामात आणि अमरनाथ यात्रेच्या तोंडावर हा हल्ला झाल्याने आता हल्लेखोरांना सडेतोड उत्तर दिलं जावं अशी भावना सामान्य नागरिकांनी बोलून दाखवली आहे. The Resistance Front ही पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची एक शाखा आहे. त्यांनी कश्मीर मध्ये मागील काही वर्षात घडल्या या 22 एप्रिलच्या भयंकर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

TRF च्या दाव्यानुसार, स्थानिक नसलेल्यांना 85 हजार पेक्षा जास्त लोकांना अधिक domicile दिले गेले आहेत, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे गैर-स्थानिक पर्यटकांचे सोंग घेऊन येतात, अधिवास मिळवतात आणि नंतर जमिनीचे मालक असल्यासारखे वागू लागतात.

Saifullah Kasuri हल्ल्याचा मास्टरमाईंड

लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद हा पहलगाम मधील हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक असल्याचा संशय आहे. अहवालांमध्ये गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार ही माहिती मिळाली आहे. रावलकोटमधील दोन लष्कर कमांडर, ज्यापैकी एक अबू मुसा आहे, यांच्या भूमिकेची देखील चौकशी सुरू आहे. लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद आहे.

कसुरीचा पाकिस्तानात प्रभाव आहे आणि पाकिस्तानी लष्करी अधिकारी त्याची सेवा करण्यास तयार आहेत यावरून याचा अंदाज येतो. तो अनेकदा पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांना चिथावणी देतो असाही दावा केला जातो.  पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे दोन महिने आधी, सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूरला पोहोचला होता. पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन येथे राहते.

The Resistance Front काय आहे?

रिपोर्ट्स नुसार, ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर उदयास आलेली रेझिस्टन्स फ्रंट (The Resistance Front) ही एक नवीन दहशतवादी संघटना आहे. लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) ची एक प्रॉक्सी शाखा मानली जाणारी टीआरएफची स्थापना काश्मीरमधील दहशतवादाला स्थानिक चेहरा देण्यासाठी करण्यात आली होती.

ऑक्टोबर 2019 मध्ये स्थापन झालेल्या या गटाचे नेतृत्व शेख सज्जाद गुलास यांनी केले होते, तर बासित अहमद दार हे मुख्य ऑपरेशनल कमांडर म्हणून काम करत होते. रिपोर्ट्सनुसार, टीआरएफची स्थापना सुरुवातीला हिजबुल मुजाहिदीन आणि एलईटीच्या कार्यकर्त्यांसह करण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित कामगार तसेच सुरक्षा दलांसह नागरिकांवर झालेल्या बहुतेक हल्ल्यांमध्ये टीआरएफची भूमिका आहे. कसुरीला सूत्रधार मानले जात असले तरी, पहलगाममधील प्रत्यक्ष हल्ला आसिफ नावाच्या एका टीआरएफ कार्यकर्त्याने केला. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्रांवरून असे दिसून आले की तो सुलेमान शाह आणि अबू तल्हा यांच्यासह तीन हल्लेखोरांपैकी तो एक होता.