Photo Credit- X

पहलगाम (Pahalgam) मध्ये बैसरण व्हॅलीत (Baisaran Valley) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. भारताने सारे पाकिस्तानी वीजा रद्द करत 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सार्‍या मुख्यमंत्र्यांना फोन करून राज्यातील पाकिस्तानी तात्काळ देश सोडतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

भारताने 27 एप्रिल पर्यंत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याच्या आणि पाकिस्तान मध्ये असलेल्या भारतीयांना देशात परतण्याच्या सूचना केल्या आहेत. अमित शहांनी प्रत्येक राज्यात किती पाकिस्तानी नागरिक आहेत? याची माहिती घेत त्यांचे डिपोर्टेशन करावे असं म्हटलं असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. नक्की वाचा:  India Strikes Back: सिंधू पाणी करार स्थगित, अटारी वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी; Pahalgam Terror Attack नंतर भारताचे 5 महत्त्वाचे निर्णय .

अमित शाह यांचे मुख्यमंत्र्यांना आदेश

The Ministry of External Affairs ने दिलेल्या माहितीमध्ये 27 एप्रिलपासून भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा रद्द केले जातील. एका निवेदनात, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त 29 एप्रिलपर्यंत वैध राहतील. सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांचा व्हिसा संपण्यापूर्वी देश सोडणे आवश्यक असल्याचेही म्हटलं आहे. कालच दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. यामध्ये  विरोधी पक्षासोबत देशातील दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तान विरूद्ध कडकं पावलं उचलण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यासाठी काही योजनांवर चर्चा झाली आहे. विरोधी पक्षानेही सरकारला पाकिस्तानला जसाच तसे उत्तर देण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. नक्की वाचा:  Pahalgam Terror Attack मध्ये सहभागी Asif Sheikh, Adil Thoker चे Tral आणि Bijbehara मधील घर बेचिराख; व्हिडिओ झाला वायरल .

महाराष्ट्रात मुदतीनंतर राहणार्‍या पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई होणार

पहलगाम मधील हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 3-4 दहशतवाद्यांनी धर्म विचारून पुरूष पर्यटकांना लक्ष्य केले.  त्यांना गोळ्या झाडून ठार मारलं. यामध्ये दोन मुस्लिम स्थानिकांचाही मृत्यू झाला आहे.