खऱ्याखुऱ्या हिरोंच वैशिष्ट असे की भलेही ते काळाच्या पडद्याआड गेले तरीही ते हिरोच राहतात. उदा. मृत्यूपश्चात अवयवदान (Organ Donation) करुन तब्बल सहा जणांना जीवदान देणारा केरळ राज्यातील बीआर सारंग (BR Sarang) हा मुलगा. बी आर सारंग. वय वर्षे अवघी सोळा. वर्ष भर मन लावून अभ्यास केलेला. नुकतीच इयत्ता दाहवीची परीक्षा देऊन सुट्टीचा आनंद घेत होता. नियतीच्या मनात काही भलतेच होते. बीआर सारंग याचा अपघाती मृत्यू झाला. केरळ बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागायच्या काहीच दिवस आगोदर ही घटना घडली. वडक्कोटुकव येथील कुननथुकोनम पुलाजवळ सारंग त्याच्या आईसोबत ऑटोरिक्षाने जात असताना 6 मे रोजी झालेल्या अपघातात तो जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
इतर सर्वच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांप्रमाणे बीआर सारंग आणि त्याचे आईवडील बिनेश कुमार आणि रजनीश यांना निकालाची उत्सुकता होती. ही उत्सुकता कायम असतानाच सारंग याचे अपक्षाती निधन झाले. पण हाचच सारंग पुढे केरळ बोर्डात इयत्ता दहावी परीक्षेत टॉपर ठरला. त्याच्या आईवडीलांना त्याच्या निधनाचे दु:ख होते. मात्र, त्यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय तातडीने घेतला. ज्यामुळे चक्क सहा लोकांचे प्राण वाचले. (हेही वाचा, Karnataka: लग्नाच्या रिसेप्शनवेळी मृत्यू झालेल्या मुलीचे पालकांनी केले अवयव दान)
अधिक माहिती अशी की, अटिंगल येथील सरकारी बॉईज एचएसएसचा विद्यार्थी सारंग याचा 6 मे रोजी झालेल्या अपघातात जखमींवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बुधवारी सकाळी एसएसएलसीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले, ज्यामध्ये त्याने पूर्ण A+ मिळवले. तसुद्धा ग्रेस मार्क्सची कोणतीही मदत न घेता.
दरम्यान, राज्याचे सामान्य शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी हे पत्रकार परिषदेत एसएसएलसी निकाल जाहीर करताना भावूक झाले. पत्रकार परिषदेदरम्यान, नुकतेच अपघातात निधन झालेल्या सारंगने अव्वल दर्जा मिळवल्याचे नमूद केल्यावर मंत्र्यांना अश्रू आवरता आले नाहीत. शिक्षणमंत्री शिवणकुट्टी म्हणाले अवयवदानाच्या कुटुंबाच्या निर्णयामुळे समाजाला समाजसेवेसाठी प्रोत्साहन मिळेल.