कोच्चि :केरळ उच्च न्यायालयाच्या (Keral High Court)अलीकडेच आलेल्या निर्णयानुसार यापुढे आपल्यापाशी अश्लील फोटो बाळगणं हा कायद्याने दंडनीय गुन्हा असणार नाही. यापूर्वी स्त्री अशिष्ट रूपण प्रतिषेध कायद्याच्या (Indecent Representation of Women (Prohibition) Act) अंतर्गत महिलांचे अश्लील फोटो कोणाजवळ आढळलल्यास त्या संबंधित व्यक्तीला दंड आकारला जायचा मात्र आता आलेल्या निर्णयामुळे या कायद्यात मोठा बदल झाला आहे.
कोल्लम येथे तब्बल अकरा वर्षांपूर्वी एका स्त्री पुरुषाच्या विरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायमूर्ती राजा विजयवर्गीय यांनी या निर्णयाची घोषणा केली ज्यानुसार कोणत्याही प्रौढ व्यक्तीकडे अश्लील फोटो असेलं आणि त्याचा कोणत्याही जाहिरात किंवा माध्यमावर वापर केला नसेल तर हा प्रकार 1968 मधील कायद्याच्या कलम 60 अंतर्गत गुन्ह्यामध्ये गृहीत धरला जाणार नाही. अश्लील फोटो blur ठेवणारं Instagram नवं 'सेन्सिटिव्ही स्क्रीन' फिचर सादर
2008 मध्ये कोल्लम पूर्व पोलीस हददीत शोध मोहीम सुरु असताना या बस स्टॅन्ड वरून एका दाम्पत्याची बॅग चेक केली होती त्यामध्ये दोन कॅमेरे सापडले होते ज्यात त्यापैकी महिलेचे काहीशे अश्लील फोटो संग्रहित होते. यावरून पोलिसांनी एका या दोघांना अटक करून कॅमेरे जप्त केले होते.या संदर्भात आज सुनावणी सुरु असताना हा निर्णय घेण्यात आला.हा खटला कोल्लम मॅजिस्ट्रेट समोर बऱ्याच काळापासून प्रलंबित होता.