
फोटो, व्हिडिओजच्या माध्यमातून युजर्संना खिळवून ठेवणाऱ्या इंस्टाग्रामने (Instagram) नेहमीप्रमाणे यंदाही नवे फिचर्स सादर केले आहे. 'सेन्सिटिव्ही स्क्रीन' (Sensitive Screen) असे या फिचरचे नाव आहे. या फिचरमुळे अश्लील फोटो, व्हिडिओ, थंबनेल्स क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत. या फिचरमुळे एकाच वेळी मल्टिपल अकाऊंट्सवरून पोस्ट करणे शक्य होणार आहे. तसंच मॅल्टिपल अकाऊंट्स एकाच वेळी हँडल करणे सोपं होणार आहे.
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी यासंबंधीत घोषणा केली. या फिचरमुळे अश्लील, बेताल, वादग्रस्त कमेंट्सना आळा बसण्यास मदत होईल. तसंच अल्प वयीन मुला-मुलींवर अश्लील कन्टेंटचा प्रभाव पडू नये, म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याने आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केली, असा आरोप पालकांनी केला होता. त्यानंतर इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी तरुणांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश कंपन्यांना दिले होते. त्यामुळे इंस्टाग्रामने हे नवे फिचर आणले आहे. सोशल मीडियाचा वापर तरुणाई मोठ्या प्रमाणावर करत असल्याने त्यांची सुरक्षितता देखील जपणे गरजचे आहे.