कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध; वाढत्या किमतीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न
Onions (Photo Credits: IANS)

दिवसेंदिवस कांद्याचे वाढते दर (Onion Prices) पाहता भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) तर्फे नवनवीन मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रविवारी (29 सप्टेंबर) रोजी कांद्याची किमंत प्रति किलो 80 रुपयांवर पोहचली असताना केंद्र सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर (Onion Export) निर्बंध लावले आहेत. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात पुढील सूचनेपर्यंत होणार नाही असे समजत आहे. नाशिक येथे 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला, उत्पादकाकडून पोलिसात तक्रार दाखल

प्राप्त माहितीनुसार,यंदाच्या पावसामुळे कांदा उत्पादनावर बराच प्रभाव पडला. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील लासलगाव कांदा बाजारात देखील प्रति शंभर किलो मागे १००० रुपये दराने कांदा विकला गेला होता.तरीही लासलगाव बाजारात कांद्याच्या भावात झालेली दरवाढ ही मागील काही दिवसात स्थिररूपात झाली आहे. तर दुसरीकडे कर्नाटक राज्यातील काही भागात अति पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने कांद्यासह अन्य उत्पादनांचे भाव देखील वधारले होते. साहजिकच यामुळे मुंबई, दिल्ली सह अनेक मुख्य शहरात देखील नागरिकांना या किमतीचा फटका बसला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, कांद्याचे एकाएकी वाढलेले दर पाहता काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारतर्फे सर्व राज्यांना एक पत्रक पाठवण्यात आले होते, ज्यानुसार कांद्याचा तुटवडा भासत असल्यास केंद्राकडे सूचना द्याव्या या मागण्या तातडीने पूर्ण केल्या जातील असे सांगण्यात आले होते.