पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्याकडून देशवासियांना मकर संक्रांत सणाचा शुभेच्छा!
Modi | Photo Credits: ANI

नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankrant). यंदा लीप इयर असल्याने 15 जानेवारी दिवशी महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहाने या सणाचं स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांत तर तमिळनाडू मध्ये आज पोंगल (Pongal) सणाचा उत्साह आहे.गुजरात मध्ये उत्तरायण साजरा केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या नववर्षातील पहिल्या वहिल्या सणाचं औचित्य साधत देशवासियांना मकर संक्रांत सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांसोबतच अनेक राजकीय मंडळींनी आज संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

मकर संक्रांती दिवशी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण आज तीळगुळ वाटून गोडाधोडात साजरा केला जातो. गुजरातमध्ये यंदा उत्तरायणाच्या धामधूमीमध्ये पतंगबाजीचा उत्साह आहे. गुजरात मध्ये उत्तरायणाच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. केवाडिया येथील सरोवर धरणाजवळ असलेल्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' जवळ पतंगबाजीचा आनंद लुटला. त्याचे फोटोदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी भारतवासियांना दिल्या मकर संक्रांंतीच्या शुभेच्छा 

देवेंद्र फडणवीस

वाचा नक्की: मकरसंक्रांती आणि लोहरी च्या शुभेच्छा देत अमृता फडणवीस यांचे खास ट्विट; मात्र 'अशी' झाली गंंमत.

शरद पवार 

आज आकाशामध्ये विविध आकाराच्या, रंगाच्या पतंग उडताना, काटाकाटीचा खेळ रंगताना दिसणार आहे. दरम्यान या खेळामध्ये स्वतःची आणि इतरांची सुरक्षा यांचं भान राखत हा खेळ खेळण्याचा सल्ला दिला जात आहे.