Supreme Court, Nupur Sharma (PC -Wikimedia Commons/ANI)

Supreme Court On Nupur Sharma: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. निलंबीत भाजप नेत्याच्या गैरवर्तणुकीमुळे संपूर्ण देशात वणवा पेटला असून त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही बिघडली आहे. यासाठी नुपूरने संपूर्ण देशाची माफी मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नुपूरने आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अनेक राज्यांमध्ये नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुपूर यांनी म्हटलं आहे की, तिला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे ती इतर राज्यात जाऊ शकत नाही. या सुनावणीदरम्यान न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नूपूरला फटकारले आहे.

एका निंदनीय टिप्पणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, उदयपूरमध्ये एका शिंपीची हत्या करण्यात आलेल्या दुर्दैवी घटनेलाही त्यांच्याविरोधातील नाराजी कारणीभूत आहे. नुपूर यांनी टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागायला हवी होती, त्यासाठी त्यांनी खूप उशीर केला, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. (हेही वाचा - Income Tax Notice to Sharad Pawar: शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणूक शपथपत्रांसदर्भात मागितले विवरण)

नुपूर शर्माला तिच्या अहंकाराबद्दल फटकारताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, त्या एका मोठ्या पक्षाच्या प्रवक्त्या होत्या, त्यामुळे त्यांच्या डोक्यात पावर होती. सुप्रीम कोर्टाने नुपूरची ती याचिकाही फेटाळून लावली. ज्यामध्ये तिने अनेक राज्यांमध्ये दाखल असलेले सर्व खटले दिल्लीला हस्तांतरित करण्याचे आवाहन केले होते. न्यायालयाने नुपूरच्या वकिलाला या प्रकरणी संबंधित उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली आहे. यानंतर नुपूरने सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांना फटकारले आहे. नुपूर शर्माविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला. न्यायालयाने म्हटले की, नुपूरच्या तक्रारीवरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. परंतु, अनेक एफआयआर असूनही नुपूरविरोधात अद्याप दिल्ली पोलिसांनी कोणतीचं अॅक्शन घेतलेली नाही.