केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल झाली आहे. ही तक्रार भारतीय विद्यार्थी संघटना (National Students' Union of India) राष्ट्रीय महासचिव नागेश करिअप्पा (Nagesh Kariyappa) यांनी दाखल केली आहे. नागेश अरिअप्पा हे विद्यार्थी नेते आहेत. त्यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाणे येथे ही तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोविड 19 काळात बेपत्ता आहेत. नागरिक संकटात आहेत. अशा काळात ते बेपत्ता झाल्याचे करिअप्पा यांनी तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्याने या तक्रारीची देशभर चर्चा सुरु झाली आहे. प्रसारमाध्यमांतूनही या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.
एनएसयूआय (NSUI) राष्ट्रीय महासचिव करीअप्पा यांनी पुढे आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजकारण्यांनीच जनतेची सेवा करायची असते. संकट काळात पळून जायचे नसते. त्यामुळे देशात कोरोना महामारीसारखा साथीचा धोकादायक रोग पसरकला असताना देश संकटात आहे. नागरिक संकटात आहेत. तेव्हा संपर्ण देशाची जबाबदारी घेऊन काम करणे हे राजकारण्यांचे कर्तव्य आहे. असे असताना अमित शाहा गायब झाले आहेत, असे करीअप्पा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
नागेश करीअप्पा यांनी आक्रमक होत अमित शाह हे संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहेत की केवळ भारतीय जनता पक्षाचे? असा सवाल उपस्थित केला आहे. कोरोना व्हायरस महामारी संकट हाताळण्यात विद्यमान केंद्र सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आपण थेट पोलीसात तक्रार दाखल केली आहे. सरकार यावर काय उत्तर देते याची आम्ही वाट पाहात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Central Vista Project: काँग्रेससह12 विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; अनावश्यक खर्च टाळून सर्व निधी कोरोना व्हायरस महामारी निवारासाठी खर्च करण्याची मागणी)
दरम्यान, एनएसयूआय प्रवक्ते आणि राष्ट्रीय सचिव असलेल्या लोकेश चुघ यांनी म्हटले आहे की, या देशात नागरीक ही राजकारण्यांची जबाबदारी होती. परंतू, 2013 पासून देशातील परिस्थीती पूर्णपणे बदलली आहे. कोरोना महामारीच्या काळात देशातील सर्वात शक्तिशाली आणि जबाबदार असलेल्या व्यक्ती बपत्ता झाल्या आहेत, असे म्हणत चूघ यांनी करिअप्पा यांच्या तक्रारीचे समर्थन केले आहे.