LPG Gas Cylinder Price (Photo Credits: ANI/Twitter)

आज (1 ऑक्टोबर) पासून नवा महिन्याला सुरूवात झाली आहे. पण या सणासुदीच्या काळात सामान्याचं आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. आजपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये गॅस दरांमध्ये वाढ होणार आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये विनाअनुदानित गॅसच्या दरात सुमारे 15 रूपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत सुमारे 574.50 रूपये इतका आहे. तर 19 किलो ग्रॅम गॅस सिलेंडरची किंमत 1035.50 इतकी आहे. सप्टेंबर पाठोपाठ सलग दुसर्‍या महिन्यात ही दरवाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. 1 ऑक्टोंबर पासून 'या' नियमात होणार बदल, अधिक जाणून घ्या

मागील दोन महिन्यात सातत्याने पेट्रोलियमच्या दरात चढ-उतार होत आहे. ऑगस्ट महिन्यात सिलेंडरच्या किंमतींमध्ये 62.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियामध्ये ऑईल रिफायनरींवर ड्रोन हल्ला झाल्याने इंधनाचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्याचा परिणाम आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतींसोबतच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींवरही दिसून येत आहे. उसाचे उत्पादन घटल्याने साखर महागण्याची शक्यता, दिवाळीचा गोडवा होणार कमी

ONGC आणि Indian Oil Ltd द्वारा पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत कमी करून 3.23 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट केल्याची माहिती पेट्रोलिअम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलकडून देण्यात आली. 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे नवे दर लागू असतील. सामान्यपणे दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित केल्या जातात. हे दर 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी घोषित केले जातात.