Indian Railways. Representational Image (Photo Credits: Youtube)

No Waiting List Train Tickets?: नॅशनल रेल्वेचा प्लॅन ड्राफ्ट समोर आल्यानंतर वेटिंग तिकिट संबंधात लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या. त्यानुसार 2024 पासून ट्रेनसाठी वेटिंग लिस्ट सुविधा असणार की नाही किंवा फक्त कंम्फर्म तिकिट दिले जाईल असे प्रश्न उद्भवू लागले. यावर रेल्वे विभागाकडून असे सांगितले आहे की, सध्या रेल्वेकडून अशा पद्धतीची कोणतीच योजना तयार करण्यात आलेली नाही. या व्यतिरिक्त मागणीच्या मते रेल्वेने आपली क्षमता वाढवण्यावर काम करत आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना कंम्फर्म सीट मिळेल.(Indian Railway Mega Bharti: भारतीय रेल्वे मध्ये 1.4 लाख जागांसाठी मेगा भरती, परीक्षांसाठी रेल्वेकडून विशेष तयारी)

रेल्वेने एका दिवसापूर्वी नॅशनल रेल्वे प्लॅनचा ड्राफ्ट जाहीर करण्यात आला होता. यामध्ये वेटलिस्टेड तिकिटासंबंधित मीडिया रिपोर्ट्स मध्ये याचा उल्लेख केला होता. रेल्वे वेटिंग लिस्ट सिस्टिम बंद होणार असून कंम्फर्म सीट दिली जाणार आहे. तर येत्या दिवसात मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये वेटिंग लिस्ट तिकिट मिळणार की नाही असा सजम निर्माण झाला होता.(खुशखबर! Air India मधून विमान प्रवास करणा-या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणार 50% सूट, 'ह्या' असतील महत्त्वाच्या अटी)

Tweet:

वेटिंग लिस्ट तिकिटासंदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण होत होत्या. मात्र यावर रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यांनी असे म्हटले की, रेल्वेची क्षमता वाढवली जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर वेटिंग लिस्टची सुविधा नागरिकांसाठी सुरुच राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.