खुशखबर! Air India मधून विमान प्रवास करणा-या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणार 50% सूट, 'ह्या' असतील महत्त्वाच्या अटी
Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

आकाशात उडणा-या विमानाकडे पाहून आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र या विमान प्रवासाचे तिकिट सामान्यांना परवडणारे नसल्याने अनेकांचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहते. अत्यंत कमी वेळात आणि आरामदायी असलेला हा विमानप्रवास अनेकांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे आपल्या उतारवयातही हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी इच्छा बाळगणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) एअर इंडियाने (Air India) एक आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एअर इंडियाने प्रवास करायचा असल्यास त्यांना तिकिटावर 50% च्या सूट मिळणार आहे. मात्र त्यासाठी कमीत कमी 7 दिवस आधी तिकिट बुकिंग करणे आवश्यक आहे.

विमान तिकिटावर मिळणारी ही जबरदस्त सूट ज्येष्ठ नागरिकांना खूपच फायद्याची ठरेल. त्यामुळे त्यांना त्यांचा मनपसंत प्रवास विमानातून करता येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि अटी असतील. त्याचे पालन करणे जरूरीचे आहे. एअर इंडियाच्या वेबसाईटवर याची सविस्तर माहिती दिली आहे.हेदेखील वाचा- Farmers Protest: शेतकरी आंदोलनामुळे विमान चुकलेल्या प्रवाशांना Air India चा दिलासा; दुसरी फ्लाईट पकडता येणार 

1. तुम्ही भारतीय नागरिक असून तुमचे वय 60 वर्ष वा त्याहून अधिक असणे गरजेचे

2. ही सुविधा Domestic Flights (देशांतर्गत उड्डाणे) साठीच असेल.

3. चेक इन वेळी वैध आयडी (ओळखपत्र) न दाखवल्यास बेसिक भाडे जप्त केले जाईल ज्याचे रिफंड देखील मिळणार नाही.

4. वैध फोटो आयडी ज्यात योग्य ती जन्मतारीख असली पाहिजे

5. इकोनॉमी क्लासमध्ये बुकिंगवेळी मूळ तिकिटाच्या रकमेची 50% रक्कमच भरावी लागेल.

6. भारतात कोणत्याही सेक्टरच्या प्रवासादरम्यान ही ऑफर लागू असेल

7. ही ऑफर तिकिट काढल्यानंतर त्या तारखेपासून पुढील 1 वर्षासाठी लागू असेल.

एअर इंडियाने याआधीही ही स्कीम चालवली होती. मात्र आता सरकराने याला मंजूरू दिली आहे. असे सांगण्यात येते की, एअर इंडिया सध्या तोट्यात आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी एअर इंडियाने हा नवा फंडा आणला आहे