शेतकऱ्याचे कृषी उत्पन्न दुप्पट (Doubling the income of farmers)करण्याबाबत केंद्र सरकारची अशी कोणतीच योजना नाही, अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग (Ministry Of Food Processing Industries) राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती (Sadhvi Niranjan Jyoti) यांनी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार आर पार्थिपन आणि जोएस जॉर्ज यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्र्यांचे हे वक्तव्य ऐकून विरोधी पक्षही अवाक झाला. राज्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यांच्या थेट उलट स्थिती दर्शवणारे आहे. पंतप्रधान मोदींनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत अश्वासन दिले होते. तसेच, आपल्या अनेक भाषणांतूनही मोदींनी हा दावा लाऊन धरला होता. सत्तेत आल्यापासून ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत जनतेला सतत अश्वस्त करत आले आहेत.
दरम्यान, संसदेत माहिती देताना साध्वी निरंजन ज्योति यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी काही योजनांवर काम सुरु आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत सरकार कोणती योजना बनवत आहे काय, या बाबत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडे विचारणा करण्यात आली होती. खासदारांच्या या प्रश्नाला 18 डिसेंबर रोजी दिलेल्या लेखी उत्तरात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट बनविण्याबात सरकार कोणतीच योजना बनवत नसल्याचे सांगितले. प्रश्न क्रमांक (क) ला उत्तर (क)द्वारे माहिती देण्यात आली. (हेही वाचा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, मुख्यमंत्री कमलानाथ यांचा निर्णय)
दरम्यान, आपल्या लिखित उत्तरात मंत्री साध्वी निरंजन ज्योति यांनी सांगितले की, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे यासाठी पीएमकेएसवाय ही योजना आणणार आहे. तसेच शेतकऱ्यांचं शेतमालाला चांगला भाव मिळून उत्पन्न वाढाव यासाठीही सरकार काही योजनावर काम करत आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्याच्या कच्चा मालाला चांगला भाव मिळावा असा आहे.