बिहारमध्ये (Bihar) नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारने (Mahagathbandhan Government) बुधवारी (24 ऑगस्ट) रोजी विश्वासदर्शक ठराव जिंकला. या वेळी विरोधी पक्षातील भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारने 165 आमदारांच्या पाठिंब्याने, 243 सदस्यांच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव (Nitish Kumar Wins Bihar Trust Vote) सहज जिंकला. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान, नीतीश कुमार यांनी भाजपकडून होणाऱ्या फ्लिप-फ्लॉप टीका आणि आरजेडीने परत येण्याबाबतच्या अवाहनावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की त्यांनी महाआघाडीशी पुन्हा हातमिळवणी केल्यावर त्यांना बिहारचे मुख्यमंत्री बनायचे नव्हते.
नीतीश कुमार यांना पंतप्रधान बनायचे आहे, असा आरोप त्यांच्यावर विरोधक नेहमी करतात. या आरोपावर कुमार म्हणाले की त्यांची कोणतीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. परंतु बिहारसाठी काम करण्याची इच्छा आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपला फक्त 2020 च्या विधानसभा निवडणुका लक्षात ठेवू नका, तर मागील निवडणुका तसेच जेडी(यू) (JD(U) ) ने भगव्या पक्षापेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या असे सांगितले. (हेही वाचा, CBI Raids on Tejashwi Yadav Mall: तेजस्वी यादव यांच्या मॉलवर सीबीआयचा छापा, नोकरी घोटाळ्यातही अडचणी वाढण्याची शक्यता)
केंद्रावर निशाणा साधत नीतीश कुमार म्हणाले की, पाटणा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्याची त्यांची विनंती मान्य करण्यात आली नाही. 2017 मध्ये मी पाटणा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्याची मागणी केली तेव्हा कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. आता तुम्ही (केंद्र सरकार) तुमच्या कामाची जाहिरात करण्यासाठी तेच कराल. सोशल मीडिया आणि प्रेसवर त्यांचे नियंत्रण आहे. प्रत्येकजण फक्त केंद्राच्या कामावर चर्चा करत आहे, असेही नीतीश कुमार म्हणाले.
ट्विट
We (RJD and JDU) have taken the pledge to work together for the development of Bihar. Leaders from across the country called me and congratulated me on this decision and I urged all of them to fight together in the 2024 elections: Bihar CM Nitish Kumar in Legislative Assembly pic.twitter.com/gUUmXuujMm
— ANI (@ANI) August 24, 2022
पुढे बोलताना नीतीश कुमार म्हणाले, वाजपेयी, अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी मला आदराने वागवले. त्यांनाच बाजूला केल्याच्या निषेधार्थ आपण 2013 मध्ये भाजपशी संबंध तोडल, अशी आठवणही त्यांनी या वेळी सांगितली.