बिहारमध्ये (Bihar) सत्तांतर घडवून सत्तेत आलेले नीतीश कुमार (Nitish Kumar) आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील राजद-जदयु (RJD-JDU) सरकार आज विधिमंडळात बहुमत सिद्ध करणार आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला सीबीआयने रेल्वेतील नोकरी आणि बदल्यात जमीन या प्रकरणाची चौकशी जोरदारपणे सुरु केली आहे. या प्रकरणात आरजेडीचे एमएलसी सुनील सिंह यांच्यासह 4 नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरु केली आहे. ही छापेमारी गुरुग्रामपर्यंत पोहोचला आहे आणि तेजस्वी यादव यांच्या मॉलवरही (CBI Raids on Tejashwi Yadav Mall) छापेमारी सुरु झाली आहे. क्यूब्स 71 मॉलच्या निर्मितीमध्ये जॉब घोटाळ्यातील रक्कम गुंतविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. सांगितले जाते आहे हा मॉल तेजस्वी यादव आणि त्यांच्या एका सहकाऱ्याचा आहे.
लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना रेल्वेत झालेल्या कथीत नोकरभरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करत आहे. बुधवारी सकाळी सीबीआय पटना येथीलआरजेडीच्या एमएलसी सुनील सिंह आणि खासदार फैयाज अहमद यांच्या घरीही छापेमारी झाली.या प्रकरणात सीबीआयने पटना, कटिहार आणि मधुबनी येथे छापेमारी झाली. याशिवाय दिल्लीतीलही अनेक ठिकाणी छापेमारी झाल्याचे समजते. दरम्यान, हरियाणा येथील गुरुग्राममध्येही तेजस्वी यादव यांच्या मॉलवर छापा टाकण्यात आला आहे. सर्व मिळून जवळपास 25 ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली आहे. या छापेमारीनंतर राजकारण चांगलेच पेटले आहे. (हेही वाचा, Tejashwi Yadav On Enforcement Directorate: तेजस्वी यादव यांचे ईडीला निमंत्रण, 'या माझ्या घरी मुक्काम करा')
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या छाप्यांना आम्ही घाबरत नाही. अशा प्रकारचे छापे आणि राजकारण आमच्यासोबत आज पहिल्यांदा घडत नाही. या शिवाय तेजस्वी यादव यांनी सभागृहातच उत्तरदायीत्वाबाबत वक्तवय् केले आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना म्हटले की, आपणही सभागृहात उपस्थित राहा. आम्ही त्याच ठिकाणी याचे उत्तर देऊ. याशिवाय आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी म्हटले की, ज्या पद्धतीने छापे टाकले जात आहेत त्याला ईडी अथवा सीबीआयचे छापे म्हणने चुकीचे आहे. या सर्व यंत्रणा भाजपप्रमाणे काम करतात. त्यांच्या कार्यालयातही भाजपचीच संहिता पाहायला मिळते.