Union Minister Nitin Gadkari (PC - ANI)

Nitin Gadkari Tested Coronavirus Positive: नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार मधील आणखीन एक मंंत्री सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकले गेल्याचे समजत आहे. केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari)  यांंना कोरोनाची लागण  (Coronavirus)  झाल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी गडकरी यांंनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. काल पासुन गडकरी यांंना किंंचित तब्येत बिघडल्यासारखे वाटत होते त्यामुळे डॉक्टरांंचा सल्ला घेतला असता त्यांंना कोरोनाची चाचणी करुन घेण्यास सांंगितले गेले होते आज त्या चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून लॅबमध्ये तयार झाल्याचा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा दावा

 

दरम्यान, कोरोनाची लागण झाली असली तरी सर्वांंच्या शुभेकामनांंमुळे आपली प्रकृती स्थिर आहे आणि आपण स्वतःला आयसोलेट करुन घेतले आहे अशी माहिती गडकरी यांंनी दिली आहे. या मागील काळात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ते प्रोटोकॉल पाळुन खबरदारी बाळगावी असे आवाहनही गडकरी यांंनी केले आहे.

नितिन गडकरी ट्विट

दरम्यान, नितिन गडकरी हे सध्या सुरु असणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी देखील अनुपस्थित आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे , परवेश साहिब सिंह (Parvesh Sahib Singh) यांंच्यासह अन्य 17 खासदारांना कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाल्याचे समोर आले होते. दुसरीकडे कोरोनावर मात करुनही प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमित शाह सुद्धा हॉस्पिटल मध्ये आहेत अशात आता गडकरींंना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.