Nirbhaya Gangrape Case: हायकोर्टाने आरोपी मुकेश याला दिलासा नाहीच, फाशी अटळ
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: IANS)

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी बुधवारी दिल्ली हायकोर्टाने आरोपी मुकेश कुमार याची दया याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता येत्या 22 जानेवारीला निर्भया प्रकरणी आरोपींना फाशी होणार हे कायम राहणार आहे. याचिकेत मुकेश याच्याकडून ट्रायल कोर्टाकडून जाहीर करण्यात आलेल्या डेथ वॉरंटवरच्या विरोधात अपील केले होते. बुधवारी सुनावणी दरम्यान वकीलकांकडून असे सांगण्यात आले होते की, 7 जानेवारीला ज्यावेळी ट्रायल कोर्टाने फाशी देण्याचे आदेश जाहीर केले त्यावेळी पुनर्विचार याचिकेबाबत कोणतीच माहिती नव्हती. हायकोर्टाने यावर वकिलांना असे म्हटले आहे की, तुम्ही हायकोर्टात याचिका दाखल करु नका पण ट्रायल कोर्टात जा. ट्रायल कोर्टानंतर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात जा.

पटियाला हाऊस कोर्टाने काही दिवसांपूर्वीच निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट सुद्धा जाहीर केले असून ही त्यांना फाशी होणार का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चारही आरोपींमधील एक मुकेश सिंह याने डेथ वॉरंटच्या विरोधात दया याचिका दिल्ली हायकोर्टात दाळ केली होती.(Delhi Nirbhaya Gang Rape Case: चारही आरोपींना फासावर लटकवले जाणार)

ANI Tweet:

दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी कोर्टात त्यांचे मत मांडत असे म्हटले की, 21 जानेवारीला आम्ही ट्रायल कोर्टाच्या न्यायाशीधांकडे जाणार आहोत. तोपर्यंत दया याचिका फेटाळून लावल्यास सुप्रीम कोर्टाच्या निर्णायानुसार 14 दिवसाची मुदत देणारे नवे डेथ वॉरंट जारी करावे लागणार आहे. 22 जानेवारीला फाशीची शिक्षा देणे संभव नाही. 7 जानेवारील निर्भयाच्या आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानंतर चार आरोपी मुकेश, अक्षय, विनय आणि पवन यांना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येणार आहे.