निर्भया प्रकरणातील (Nirbhaya Gangrape Case) चारही दोषींना आज, 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्याच्या निर्णयाला काल पटियाला कोर्टाकडून (Patiala Court) स्थगिती देण्यात आली परिणामी पुढील आदेश मिळेपर्यंत या दोषींच्या फाशीची तारीख पुन्हा लांबणीवर पडली आहे. मात्र पटियाला कोर्टाच्या या निर्णयाला तिहार जेल (Tihar Jail) प्रशासनाकडून दिल्ली हायकोर्टात आव्हान करण्यात आले आहे. तिहार कारागृह प्रशासनाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी दोषी विनय कडून करण्यात आलेल्या अर्जाला राष्ट्रपतींनी फेटाळले असून पुढील सुनावणी 3 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले आहे. (Delhi Gang Rape case 2012: निर्भया प्रकणातील दोषींना फाशी होणार नाही? दिल्ली न्यायालयाच्या आदेशानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया)
निर्भया प्रकरणातील चारही दोषींना आज सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे निश्चित झाले होते. दोषींकडे अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे दोषींच्या वकिलांकडून कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याने डेथ वॉरंटला पटियाला हाउस कोर्टाने स्थगिती दिली आहे. यावर बोलताना आज सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्रतिक्रिया देत, आरोपींनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याचे म्हंटले आहे. वारंवार याचिका दाखल करून दोषी फाशीला पुढे ढकलत आहेत असेच चालू राहिल्यास हा खटला कधीच संपणार नाही असेही मेहता यांनी म्हंटले आहे.
ANI ट्वीट
SG Tushar Mehta:Yesterday an application was filed to postpone the death sentence. None of the reasons mentioned in the application can go through judicial scrutiny. This case will go down in history as one of the heinous offences where the accused have abused the process of law. https://t.co/ATWY27Ljve
— ANI (@ANI) February 1, 2020
दिल्ली येथे 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. कोर्टाने 9 महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. आता 7 आठ वर्षांनंतर या दोषीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला होता मात्र त्याला देखील काही ना काही मार्गाने विलंब होत आहे.