Nirbhaya Case: फाशीच्या शिक्षेपासून बचाव करण्यासाठी आरोपी मुकेश याची हायकोर्टात धाव, घटनास्थळी उपस्थित नसल्याचा दावा
Mukesh Singh (Photo Credits: IANS)

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपींची फाशी 20 मार्चला होणार आहे. तत्पूर्वी आरोपी मुकेश याने फाशीच्या शिक्षेपासून बचाव करण्यासाठी नवे कारण शोधून काढले आहे. त्यानुसार मुकेश याने हायकोर्टात धाव घेत एक याचिका दाखल केली आहे. दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी मी त्या घटनास्थळी नसल्याचा दावा मुकेश याने केला आहे. मुकेश याने त्याच्या वकिलांच्या सहाय्याने ही याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यानुसार 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री तो घटनास्थळी नसल्याचे याचिकेत मुकेश याने म्हटले आहे.

मंगळवारी पटियाला हाउस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी मुकेश याचा अर्ज फेटाळून लावला, त्यामध्ये फाशीची शिक्षा माफ करण्यात यावी असे म्हटले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी मुकेश याचा अर्ज फेटाळून लावत त्याचे वकिल एमएल शर्मा यांच्यावर सुद्धा निशाणा साधला होता.(निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा टळली; दिल्ली कोर्टाचा निर्णय)

मुकेश याने वकिलांच्या मार्फत अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये सुद्धा मुकेश याने असा दावा केला होता की, फिर्यादी वकिलांनी काही पुरावे खोटे असल्याचे दाखवत त्याची फसवणूक केली आहे. यापूर्वी सुद्धा आरोपी मुकेश याने राष्ट्रपतींनी त्याची दयेची याचिका दिली होती. मात्र राष्ट्रपती यांनी ती फेटाळून लावल्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दुसऱ्या बाजूला मुकेशच्या वकिलांनी यापूर्वी सुद्धा असे सांगितले की, मुकेश या गुन्ह्यात सामील नव्हता. तो तेवहा केवळ बस चालवत होता. उलट तुरुंगात त्याच्यावर अनैसर्गिक शारीरिक शोषण करण्यात आले.