Gang-Rape प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

Madhya Pradesh Gang-Rape Case: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा जिल्ह्यातील (Rewa District) गुऱ्हा पोलीस स्टेशन (Gurha Police Station) परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. आरोपींनी पतीसोबत पिकनिकसाठी गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार (Gang-Rape) केला. विशेष म्हणजे आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला झाडाला बांधून ठेवले आणि त्याच्या समोर पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. हे जोडपे भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्राप्त माहितीनुसार, नवविवाहित जोडपे भैरवनाथ मंदिरात पिकनिकसाठी गेले होते, अचानक पाच आरोपी तेथे आले आणि त्यांनी पतीला झाडाला बांधले. यानंतर त्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केले. एवढचं नाही तर आरोपींनी पीडितेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नवविवाहित जोडप्याचे यावर्षी लग्न झाले. गुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिरात ते पिकनिकसाठी गेले होते. यावेळी अचानक त्याठिकाणी पाच आरोपी आले. त्यांनी अगोदर पीडित महिलेच्या पतीला मारहाण केली. यानंतर त्याला झाडाला बांधून त्यांच्यासमोर पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. (हेही वाचा -Bandra Gang Rape Case: वांद्रे मध्ये 18 वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन सामुहिक बलात्कार; एक आरोपी फरार दुसरा अटकेत)

दरम्यान, या घटनेत सात-आठ आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असल्याचे रेवाचे एसपी विवेक सिंह यांनी सांगितले आहे. पीडितेने पाच जणांची नावे सांगितली आहेत. सर्व आरोपी घटनास्थळी पार्टी करत होते. घटनास्थळी मांस आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. आरोपी रेवा जिल्ह्यातील आहेत. 22 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. भीतीमुळे पीडिता पोलिसांत तक्रारीसाठी गेली नव्हती. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता घडली. (हेही वाचा -Gang Rape Near CSMT Station in Mumbai: सीएसएमटी स्टेशन परिसरामध्ये 29 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींचा शोध सुरू)

पीडित महिलेने या प्रकरणी उशीरा तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस हे प्रकरण दडपत असल्याचा आरोपी काँग्रेसने केला आहे. या प्रकरणातील आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही. रीवा येथे इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांसह देशातील मोठे उद्योगपती तेथे पोहोचणार होते. त्यामुळे राज्याच्या प्रतिमेवर परिणाम झाला असता. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना पुढे येऊ दिले नाही.