Blinkit, Condoms (PC - FB and pixabay)

संपूर्ण जगात लोकांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे (New Year 2025) स्वागत केले. कोणी 2025 मध्ये देवाचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली, तर कोणी पर्वतांमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेत नवीन वर्ष सुरु केली. अनेकांनी घरातच 31 डिसेंबरची रात्रा साजरी केली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, भारतीयांनी ऑनलाइन क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिट (Blinkit) आणि स्विगी इंस्टामार्ट (Swiggy Instamart वरून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आता ब्लिंकिट आणि स्विगीने 31 डिसेंबरच्या रात्री मिळालेल्या ऑर्डरची आकडेवारी जाहीर केली आहे. या रात्री लोकांनी शीतपेय, चिप्स, पाण्याच्या बाटल्या, बटाटा भुजिया, कंडोम, दूध, चॉकलेट, द्राक्षे, बर्फाचे तुकडे आणि कोल्ड्रिंक्स मागवले

ब्लिंकिटने एकाच दिवसात जास्तीत जास्त ऑर्डर वितरित केल्या. ऑर्डर प्रति मिनिट आणि ऑर्डर प्रति तास यांनीही इतिहास रचला. यावेळी सर्वाधिक ऑर्डर बटाटा चिप्स आणि द्राक्षांच्या होत्या. कोलकातामध्ये 64,988 हजारांची सर्वात मोठी पार्टी ऑर्डर देण्यात आली होती. हैदराबादमधील एका ग्राहकाने डिलिव्हरी भागीदारांना 2500 ची टीप दिली. तर बंगलोरने जास्तीत जास्त टिप्स दिल्या. बेंगळुरूमध्ये टिप्सद्वारे एकूण 1,79,735 रुपये दिले गेले.

ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी 31 डिसेंबरच्या रात्री दिलेल्या ऑर्डरची आकडेवारी शेअर केली आहे.

यावेळी कंडोमची 1,22,356 पॅकेट वितरित केली. अलबिंदर धिंडसा यांच्या म्हणण्यानुसार, या काळात लोकांनी आलू भुजियाची जास्तीत जास्त 2,34,512 पॅकेट ऑर्डर केली. कंडोम दुसऱ्या क्रमांकावर होता. यादीत मिनरल वॉटर तिसऱ्या क्रमांकावर होते, लोकांनी 45,531 पाण्याच्या बाटल्या मागवल्या. पार्टीस्मार्ट चौथ्या स्थानावर आहे, ज्यांना 22,322 ऑर्डर मिळाल्या आहेत. लोकांनी ब्लिंकिटवर 6834 बर्फाचे तुकडे, 2434 इनो, 1003 लिपस्टिक आणि 762 लाइटरची पॅकेट ऑर्डर केली. (हेही वाचा: LPG Price Cut: 1 जानेवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर)

ब्लिंकिटवर कंडोमच्या 1,22,356 पाकिटांची ऑर्डर-

अल्बिंदरने कंडोम फ्लेवरच्या विक्रीचे आकडे देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, लोकांना चॉकलेट फ्लेवर सर्वात जास्त (39.1%) आवडते, त्यानंतर स्ट्रॉबेरी (31.0%), बबलगम (19.8%) आणि इतर फ्लेवर 10.1% आहेत. दुसरीकडे स्विगी इंस्टामार्टने मागच्यावर्षीच्या तुलनेत यंदा जास्त ऑर्डर पाहिल्या. अनेकांनी इतरांसाठी ऑर्डर्स केल्या होत्या. 8 पैकी 1 ऑर्डर इतरांसाठी ऑर्डर होती. स्विगी इंस्टामार्टवर 31 डिसेंबर रोजी एका व्यक्तीने 50 ऑर्डर दिल्या. मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये जास्तीत जास्त थंड पेये मागवण्यात आली होती. लुधियाना, राजकोट, पाँडेचेरी आणि कानपूरमध्ये ऑर्डर सरासरीपेक्षा 2-3 पट जास्त होत्या. तर कोलकातामध्ये 4 मिनिटांत ऑर्डर वितरित करण्यात आली.