Nationwide Bank Strike: आजच उरका बॅंकेची काम; 28-29 मार्चला बॅंकांचा संप, सलग 4 दिवस बंद राहणार बॅंका
Bank Strike. Representational Image. (File Image)

तुमची महत्त्वाची बॅंकेची असतील तर ती लवकर आटपून घ्या कारण देशभरात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग 4 दिवस बॅंक बंद राहणार आहे. अनेक कामगार संघ देशस्तरावर आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. 28 आणि 29 मार्च दिवशी देशात बॅंक युनियनने संपाची हाक दिली आहे. दरम्यान या दोन दिवसांपूर्वी शनिवार रविवार असल्याने सलग 4 दिवस बॅंक राहिल्याने अनेकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

भारतातील सर्वात मोठी बॅंक एसबीआय ने Indian Banks' Association च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बॅंक युनियनने 2 दिवसांचा संप पुकारला आहे. यामध्ये त्यांचा रोष प्रामुख्याने प्रायव्हेट सेक्टर बॅंकांचे खाजगीकरण करण्याला, Bank Law Amendment Bill-2021 ला विरोध आहे.

ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन यांनी संपावर जाण्याची नोटिस दिलेली आहे. April 2022 Bank Holiday List: एप्रिल महिन्यात गुढीपाडवा ते गुड फ्रायडे चा सण पहा किती दिवस बंद आहेत बॅंका.

State Bank of India खुली राहणार

State Bank of India ने मात्र आपण संपाच्या काळात सारे व्यवहार सुरळीत राहतील याची सोय केलेली आहे असं म्हटलं आहे. पण संपामुळे काही प्रमाणात कामाला फटका बसू शकतो.

एप्रिल 2022 महिन्यात यंदा अनेक सण आल्याने पुढील महिन्यातही अनेक दिवस बॅंकांचे व्यवहार विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.