एप्रिल (April) महिना म्हणजे अनेकांसाठी समर हॉलिडेजचा काळ असतो. शाळा- कॉलेजला उन्हाळी सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेकजण सुट्ट्या एंजॉय करण्यासाठी घराबाहेर पडतात. यंदा एप्रिल महिन्यात अनेक महत्त्वाच्या सणवारांची रेलचेल आहे. त्यामुळे तुम्हांला या महिन्यात किमान 9 सुट्ट्या तर नक्कीच आहेत. पण तुम्हांला बॅंकेची काम आवरायची असतील तर हे सणांचं गणित सांभाळून तुम्हांला सारी कामं आटपून घेण आवश्यक आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया प्रादेशिक सणा-वारानुसार प्रत्येक राज्यात, शहरामध्ये सुट्ट्या जाहीर करते. यंदा एप्रिल महिन्यात यंदा गुढीपाडवा, गुड फ्रायडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असे सण येणार असल्याने पहा कधी कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे.
एप्रिल महिना ही नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात असते. त्यामुळे यंदा देखील अनेक बॅंका 1 एप्रिलला अर्थातच सामान्य ग्राहकांसाठी बंद असणार आहे. त्यानंतर दुसरा दिवस 2 एप्रिल हा गुढी पाडव्याचा आहे. 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस असल्याने सुट्टी आहे आणि 15 एप्रिल दिवशी गुड फ्रायडे असल्याने बॅंक बंद राहणार आहे. या सणांसोबतच सार्या बॅंका चौथा आणि दुसरा शनिवार बंद असते त्यामुळे 9 आणि 23 एप्रिल दिवशी देखील बॅंक बंद राहणार आहे. सारे रविवारही बॅंक बंद असणार आहे. इथे पहा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची अधिकृत हॉलिडे लिस्ट.
बॅंक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीझ बॅंक, कर्नाटक बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया सह सार्या बॅंका बॅंक हॉलिडेज दिवशी बंद राहणार आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आता बॅंकांना सुट्टी असली तरीही ऑनलाईन बॅकिंगच्या सोयीमुळे अनेक कामं तुम्ही घरबसल्या करू शकता. आर्थिक देवाणघेवाण ऑनलाईन माध्यमातून सुरू ठेवता येऊ शकते.