भारतामध्ये 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. हिंदू विचारवंत आणि तरूणाईचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचं व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी आदर्श आहे. त्यामुळे आजचा दिवस भारत सरकार कडून राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त तरूणाईमध्ये नवचैतन्य भरण्याचा, समाजाप्रती चांगलं काम करण्याचा आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. आजच्या दिवसाचं निमित्त साधत अनेक जण स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार शेअर करतात, स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करतात.
स्वामी विवेकानंदांचे विचार जनसामान्यांना आणि प्रामुख्याने तरूणाईला सकारात्मकता देणारे असल्याने या राष्ट्रीय युवक दिनाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स, HD Images, Photos शेअर करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेले खालील फोटोज नक्की वापरू शकता. हे देखील नक्की वाचा: National Youth Day 2022: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याकडून शिकण्यासारख्या दहा खास गोष्टी.
राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा
युवा शक्ती ही देशाचं भवितव्य असतं. देशाच्या विकासामध्ये त्यांचं योगदान महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे देशातील तरूणांना आजच्या युवा दिनी स्वामी विवेकानंदाच्या शिकवणीचा वसा द्या. National Youth Day च्या निमित्ताने विविध माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्याद्वारा विवेकानंदांचे विचार पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न केला जातो.