National Security Advisor Ajit Doval | File Image | (Photo Credits: PTI)

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोभाल (Ajit Doval) यांच्या घर आणि कार्यालय परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी पकडण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत अजीत डोभाल यांनाक जीवे मारण्याचा कट असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या दहशतवाद्याने दिलेल्या माहितीत म्हटले होते की त्याने पटेल भवन आणि राजधानी दिल्ली येथील अेक ठिकाणांची रेकी केली आहे.पटेल भवन येथे अजित डोभाल यांचे कार्यालय आहे. या प्रकरणात माहिती असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्याने हेही सांगितले की पाकिस्तानातील काही लोकांच्या आदेशाने आपण हे सगळे करत आहोत.

सन 206 मध्ये झालेला सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मध्ये बालाकोट हल्ल्यानंतर अजित डोभाल हे पाकिस्तानच्या निशाण्यावर आहेत.अजित डोभाल हे भारतातील सर्वात सुरक्षीत असलेल्या लोकांपैकी एक आहेत. अजित डोभाल यांच्यावरील हल्लाचा कट असल्याच्या माहितीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला कळविण्यात आले आहे. (हेही वाचा, SCO Summit 2020: शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत पाकिस्तानने दाखवला चुकीचा नकाशा; या कृत्यामुळे अजित डोभाल यांनी अर्धवट सोडली बैठक)

दिल्ली आणि श्रीनगर येथील अधिकाऱ्यांनी अजित डोभाल यांच्या कार्यालयाची रेकी केल्याच्या व्हिडिओबाबत माहिती दिली आहे. 6 फेब्रुवारीला शोपियां येथील हिदायत उल्लाह मलिक याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे. मलिक याच्याविरोदात जम्मू येथे एक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मलिक हा जैशचा फ्रंट ग्रुप लश्कर एक मुस्तफा चा प्रमुख आहे. त्याला अनंतनाग येथून अटक करण्यात आली आहे.

हिंदुस्तान टाईन्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मलिक याने मे 2020 मध्ये एका आत्मघातकी हल्ल्यासाठी ह्युंडाई सेट्रो पुरवली होती. त्याने हाही खुलासा केला आहे की, इरफान ठोकर, उमर मुस्ताक आणि रईस मुस्ताक यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जम्मू कश्मीर च्या कॅश व्हॅनमधून 60 लाख रुपये पळवले होते.