नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
File image of Prime Minister Narendra Modi, Congress president Rahul Gandhi | (Photo Credits: PTI)

Rahul Gandhi 49th Birthday: कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींचा (Rahul Gandhi) आज (19 जून) 49 वा वाढदिवस आहे. राहुल गांधींवर आज हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यान नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी यांच्यामध्ये अनेक शाब्दिक चकमकी उडाल्या. मात्र राजकीय दुश्मनी मागे सारून नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यामातून बर्थ डे विश करताना, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. 'जनता मालिक हैं' म्हणत राहुल गांधी यांनी दिल्या पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा

नरेंद्र मोदी यांचे ट्विट

राहुल गांधींचा लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी यांनी पराभव केला. मात्र वायनाड मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत.