Mysterious Disease | Representational Image (Photo Credits: Pixabay)

आंध्रे प्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील अमरावती (Amravati) जिल्ह्यात असलेल्या एलुरु येथे एक अज्ञात आणि तितकाच रहस्यमय आजार (Mysterious Illness) पुढे आला आहे. या आजाराने बाधित झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, 292 जणांना या आजाराची लागण झाली आहे. हा नेमका कोणता आजार आहे (Mysterious Disease) यााबत स्पष्ट माहिती पुढे आली नाही. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका आरोग्य अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, आतापर्यंत 140 जणांवर उपचार करण्यात आला आहे. तर रुग्णालयात दाखल असलेल्या इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना याच अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे की, हे लोक नेमके कोणत्या कारणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत याचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. या लोकांना अचानकपणे चक्कर येणे, बेशुद्ध असा त्रास होत आहे. (हेही वाचा, CCHF: Crimean Congo Fever उत्पत्ती, आजार, लक्षणे आणि सुरक्षीतता)

विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला चक्कर येऊन अचानक बेशुद्ध पडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा प्रकारचा त्रास उद्भवलेले बरेच लोक काही वेळातच शुद्धीवर आले आणि ठिकही झाले. परंतू काही लोकांना बरे होण्यास वेळ लागला. काही लोक काही मिनिटांमध्येच बरे झाले.

दरम्यान, रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांच्यातील लक्षणांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे एक विशेष पथक एलुरु येथे पोहोचले आहे. हे पथक एलुरु येथील घराघरात जाऊन चौकशी करत आहे. माहिती घेत आहे. या भागातील आरोग्य आयुक्त कटमानेनी भास्कर हे देखील परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी संबंधित परिसरात पोहोचले आहेत.

डॉक्टरांच्या एका विशेष पथकाने रुग्णांच्या नमने गोळा केले आहेत. ते प्रयोगशाळेतही पाठवले आहेत. आता प्रयोगशाळेचा अहवाल काय येतो याबाबत उत्सुकता आहे.