Murder On CCTV In Bengaluru: दगडाने डोके ठेचून हत्या, बंगळुरु येथील थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरु (Bengaluru) शहरातील एका निर्घृण हत्येचा एक लक्ष विचलीत करणारा व्हिडिओ (Murder On CCTV In Bengaluru) इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. आम्ही सूचवतो की वाचकांनी आणि युजर्सनी इथे दिलेला व्हिडिओ स्वत:च्या जबाबदारीवर पाहावा. व्हिडिओतील दृश्य आपल्याला विचलीत करु शकते. लेटेस्टली मराठी व्हिडिओ आणि त्यानंतर च्या परिणामाची पुष्टी करत नाही. सदर व्हिडिओ बंगळुरु शहरातील एक सीसीटीव्ही फुटेज ( CCTV Footage) आहे. ज्यात एक पुरुष आणि तीन महिला अशा चौघांनी मिळून एका 30 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालत त्याची हत्या केल्याचे दिसते.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंटरनेटवर व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप केपी अग्रहारा ( KP Agrahara) परिसरात पाठिमागील शुक्रवारीच्या रात्री घडलेल्या घटनेची आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, तीन महिला आणि एक पुरुष एका तरुणाला गल्लीतील रस्त्यावर एकट्याला गाठतात. तो तरुण आणि पुरुष व महिलांच्या ग्रुपमध्ये सुरुवातीला बाचाबाची होते. त्यानंतर या ग्रुपमधील एक महिला एक मोठा दगड उचलते आणि त्या तरुणाला मारते. बाकिच्या महिला त्या तरुणाला धरुण खाली पाडतात.

दगडाचा मार वर्मी लागल्याने तरुण खाली कोसळतो. यावर समोरच्या ग्रुपमधील लोक आपल्या कृत्यावर नियंत्रण न मिळवता तरुणाच्या डोक्यात दगड घालणे सुरुच ठेवतात. धक्कादायक म्हणजे व्हिडिओत पाहायला मिळते त्यानुसार एक व्यक्ती खाली पडलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड उचलून सातत्याने पुन्हा पुन्हा मारताना दिसतो. (हेही वाचा Bareilly Shocker: बरेलीमध्ये गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार; न्यायासाठी पीडितेने गर्भ हातात घेऊन गाठले SSP कार्यालय)

पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तो मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर याचना करत होता. त्याच्या वेदनेने व्याकूळ झालेल्या वेदना ऐकूण स्थानिक नागरिक घरातून बाहेर आले. घडला प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित तरुणाला रुग्णालयात दाखल केले. परंतू, तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले.

व्हिडिओ

दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. या प्रकरणात अद्याप एकाही हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. तसेच, कोणालाही अटक करण्यात आली नाही. पीडित व्यक्ती बदामी परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.