Munger Firing: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंगेर घटनेसाठी हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन केला हल्लाबोल, बिहार राज्यपालांसह भाजपवर साधला निशाणा
Shiv Sena leader Sanjay Raut (PC - ANI)

Munger Firing: बिहार मधील मुंगेर जिल्ह्यात सोमवारी रात्री देवी दुर्गेच्या मुर्ती विसर्जनावेळी एका झटापटीत कथित रुपात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात जोरदार आंदोलने केली जात आहेत. संतप्त होत लोकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासह शहारातील अन्य ठिकाणी तोडफोड सुद्धा केली. वाहने ही जाळल्याचे दिसुन आले. घटनेनंतर सध्या जिल्ह्यात फायरिंग केल्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. याच घटनेवरुन आता राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा याचा विरोध केला आहे. मुंगेर मधील ही घटनेवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या विधानात बिहारचे राज्यपाल यांच्यासह भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले की, अशा पद्धतीची घटना जर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा राजस्थान येथे घडली असती तर राज्यपाल आणि भाजपकडून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली गेली असती. मात्र बिहारचे राज्यपाल आणि भाजप नेते आता सवाल का उपस्थितीत करत नाही आहेत? संजय राऊत यांच्याआधी काँग्रेससह विरोधी पक्षाकडून ही या घटनेचा विरोध केला आहे.(दिल्ली: गाण्याच्या आवाजावरून शेजाऱ्यांनी एकाच कुटुंबातील तिघांवर केला धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू)

दरम्यान, मुंगेरच्या घटनेचा अधिक लोकांकडून विरोधा केला जात असल्याने निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी राजेश मीणा आणि पोलीस अधिक्षक लिपी सिंह यांना तत्काळ हटवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. त्यानंतर दोन अधिकाऱ्यांना ही तत्काळ स्वरुपात हटवले आहे. तर मगध प्रमंडळाचे आयुक्त असंगबा चुबा एओ यांना या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यास सांगितले आहे.