Mumbai Weather Prediction, July 7 : शनिवारी सकाळी मुंबई शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाळ. भारतीय हवामान विभाग (IMD) ने अंदाज वर्तवला आहे की, हे ढगाळ हवामान कायम राहील, व शहर आणि उपनगरात दुपार आणि संध्याकाळी मध्यम सरी अपेक्षित आहेत. मुंबईचे तापमान आज किमान 26°C ते कमाल 31°C, सरासरी 29°C पर्यंत आहे. दिवसभर मध्यम सरीचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे, नैऋत्य दिशेकडून 13 किमी/ताशी वेगाने वारे वाहत आहेत. मुंबईत येत्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पालघर, ठाणे आणि रायगडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी आज यल्लो अलर्ट जारी केला आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये वेग वेगळ्या भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. नाशिकमध्येही एकाकी घाट भागात मुसळधार पाऊस पाडण्याचा अंदाज आहे. .आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान विभागने मुंबई चा उद्याचा हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
याशिवाय, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 'अल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यात तटस्थ राहू शकते. पण मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात यंदाच्या मान्सूनसाठी ला निनाची परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.