Sensex (Photo credits: PTI)

आज सकाळपासून सातत्याने मुंबई शेअर बाजारमध्ये पडझड होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. दरम्यान आज एका दिवसभरात निफ्टी, सेन्सेक्समध्ये ऐतिहासिक घसरण पहायला मिळाली आहे. 12 मार्च 2020 हा मुंबई शेअर बाजारच्या दृष्टीने अत्यंत निराशादायक दिवस ठरला आहे. दरम्यान सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. मागील आठवड्यात कमी अधिक फरकाने शेअर बाजारात उसळी आणि घसरण पहायला मिळत होती. मात्र 3000 पेक्षा अधिक अंकांनी सेन्सेक्स घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आज 4 वाजता जेव्हा शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 2919.26 अंकांनी घसरून 32,778.14 वर बंद झाला. ही सुमारे 8.18% घसरण आहे. तर निफ्टी 868.25 अंकांनी घसरून 9590.15 वर बंद झाली आहे. ही 8.3% घट आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं फैलाव झपाट्याने पसरत असल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. काल WHO ने कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीला जागतिक आरोग्य संकट म्हणून जाहीर केले आहे. त्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर झाला आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्रामध्ये 73 रूग्ण आहेत. तर जगभरात लाखभरापेक्षा अधिकांना कोरोनाने ग्रासले आहे त्यापैकी 4000 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे. मुंबई शेअर बाजार मध्ये मोडी पडझड, सेन्सेक्स 2400 पेक्षा अधिक अंकांनी घसरले तर निफ्टी 10,000 पेक्षा खाली

आज दिवसभरात निफ्टी बॅंक, प्रायव्हेट बॅंक, रिअ‍ॅल्टी, फार्मा, मेटल, मीडीया, आयटी, फायनांशिएल सर्व्हिस आणि ऑटो सेक्टरमध्ये अनेक गुंतवणूकदारांना आज 8-10% नुकसान झालं आहे. सुमारे दिवसभरात 9 लाख कोटी पेक्षा अधिक रूपयांचं नुकसान झालं आहे.

आज दिवसभरात 2242 शेअर्सनी नुकसान अनुभवलं आहे तर 200 शेअर्स फायद्यामध्ये बंद झाले आहेत.

एचडीएफसी बॅंक, रिलायंस, आयसीआयसी बॅंक, इंफोसिस, टाटा कंसल्टंसी, अ‍ॅक्सिस बॅंक यांनी नुकसान अनुभवलं आहे. त्यांनी एकत्रपणे अंदाजे 1800 पेक्षा अंकांनी नुकसान अनुभवलं आहे.