कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता भारत देशासह जगभरात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान अमेरिकन बाजार Nasdaq मध्ये 10% घट झाल्यानंतर आज (13 मार्च) दिवशी मुंबई शेअर बाजारमध्येही मोठी पडझड पहायला मिळाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळलेली पहायला आहे. प्री ओपनच्या वेळेस सेंसेक्स 4.85% घट सह 1589.92 अंकांनी पडले असून सेन्सेक्स 31,188.22 वर होता. दिवसाच्या सुरूवातीला सेन्सेक्स 2400 पेक्षा अधिक तर निफ्टी 700 पेक्षा अधिक अंकांनी कोसळल्याने निराशा आजही कायम राहणार असल्याचं चित्र आहे. आज सकाळी 9.27 वाजता 9.43% घट नोंदवण्यात आली असून सकाली 3090.62 अंकांनी सेन्सेक्स घसरल्याने तो सुमारे 29,687.52 इतका खाली गेला आहे. दरम्यान निफ्टीदेखील कोसळल्याने आता त्यामधील ट्रेडिंग 45 मिनिटांसाठी बंद करण्यात आले आहे. तर शेअर मार्केट 1 तासांसाठी बंद करण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजारात आज सर्वात निराशाजनक दिवस; Sensex 2,919 अंकांनी घसरला तर Nifty 9,590 या नीच्चांकावर.
काल संध्याकाळी मुंबई शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 2919.26 अंकांनी घसरून 32,778.14 वर बंद झाला. ही सुमारे 8.18% घसरण होती. तर निफ्टी 868.25 अंकांनी घसरून 9590.15 वर बंद झाला होता. निफ्टीत ही 8.3% घट होती. दरम्यान सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेक व्यापार ठप्प आहेत. तर यासोबतच रशिया आणि सौदी अरेबियामध्ये इंधनदरावरून युद्ध सुरू असून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती देखील घसरल्या आहेत. काल मुंबई शेअर बाजरामध्ये सेन्सेक्स सुमारे 3000 पेक्षा अधिक अंकांनी कोसळल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर 9 लाख कोटींचं नुकसान झाल्याची चर्चा झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयामध्ये 16 पैशांची घसरण झाली आहे. तर तो 74.44 वर आला आहे.
Trading in NIFTY has stopped for 45 minutes due to lower circuit limit after the market fell over 10% in the initial trade pic.twitter.com/hYG8wxDaOO
— ANI (@ANI) March 13, 2020
भारतामध्ये सध्या कोरोनाचे रूग्ण 70 पेक्षा अधिक आहेत तर कर्नाटकामध्ये एका 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली शहरांमध्ये नागरिकांना सावधानता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चीनमधून पसरलेल्या या जीवघेण्या व्हायरसग्रस्तांचं प्रमाण आता हळूहळू घटत आहे.