Mumbai Rain Alert: मुंबईत गुरुवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नवरात्रोत्सवाच्या उत्सवावर विरजण पडले. याशिवाय शहरातील सामान्य कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी, पाणी तुंबणे, वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या दिसून आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पाणी साचल्याचे आणि वाहतूक कोंडीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ठाणे-मुलुंड, दादर, अंधेरी, वांद्रे, बोरिवली यांसारख्या मुंबईतील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या अनपेक्षित हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान खात्याने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत
#WATCH | Maharashtra: Waterlogging witnessed in NM Joshi Marg in Prabha Devi as heavy rain lashes Mumbai. pic.twitter.com/TtGo1HLj3k
— ANI (@ANI) October 10, 2024
चुनाभट्टी परिसरात पावसामुळे वाहतूक कोंडीची समस्या
#WATCH | Maharashtra: Heavy rain lashes parts of Mumbai. Visuals from Chunabhatti area. pic.twitter.com/piJF6gi72x
— ANI (@ANI) October 10, 2024
वडाळ्यातही पावसाचा परिणाम
#WATCH | Maharashtra: Heavy rain lashes parts of Mumbai. Visuals from Wadala. pic.twitter.com/WIzJM3G0Bv
— ANI (@ANI) October 10, 2024
मुसळधार पावसामुळे एल्फिन्स्टन रोड परिसरात साचले पाणी
हवामान खात्याने अलर्ट केला जारी
#WATCH | Maharashtra: Waterlogging witnessed in Elphinstone Road area of Mumbai as heavy rain lashes Mumbai. pic.twitter.com/MEBVENQZHG
— ANI (@ANI) October 10, 2024
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ३ ते ४ तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः ठाणे-मुलुंड, मुलुंड-कुर्ला, घाटकोपर, दादर, वरळी आणि बीकेसीमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. IMD ने 11 ऑक्टोबरसाठी पिवळा अलर्ट देखील जारी केला आहे, याचा अर्थ येत्या काही दिवसांतही मुसळधार पाऊस पडू शकतो.