मागील तीन ते चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई तसेच उपनगरांत आज पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील वाहतूक सेवेवरही याचा किंचितसा परिणाम जाणवत असून मुंबई लोकल काही मिनिटं उशिराने धावत असल्याचे समजते. मुंबईत सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) दादर, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे, याचा फटका वाहतुकीवर झाला आहे. मुसळधार पावसामुळे समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी (Police) नागरिकानी केलं आहे. (हेही वाचा - Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!)
दरम्यान, आज देखील मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 23.3 मिमी तर सांताक्रूझ केंद्रात 92.9 मिमी पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पण रविवार असल्यामुळे रस्त्यावर कमी वाहने असल्यामुळे वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवला नाही. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुक मंदावली आहे. मात्र रविवार रस्त्यावर तुलनेने वाहने कमी असल्यामुळे तेवढा परिणाम जाणवलेला नाही. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. त्यात किंग सर्कल, दादर टीटी, अंधेरी सब-वे, कांदिवली, वाकोला, कुर्ला ठिकाणांचा समावेश आहे. वाकोला येथे अपघातामुळे वाहतुक संथ गतीने सुरू होती.