Mumbai Weather Prediction, July22 : मुंबईत आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain)जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबईकरांना पोलिसांकडून(Mumbai Police) करण्यात आले आहे.शनिवार, 20 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता संपलेल्या 24 तासाच्या कालावाधीत IMD कुलाबा वेधशाळेने 93 मिमी पावसाची नोंद केली. IMD ने आज रविवार पासून ते मंगळवार 23 जुलै पर्यन्त मुंबई,ठाणे आणि पालघर मध्ये यल्लो अलर्ट जारी केला आहे.राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं धरणांमधील (Dam) पाणीपातळीत देखील वाढ होत आहे. मुंबई आणि त्याच्या शेजारच्या भागात पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहेत.आता मुंबईत उद्याचे वातावरण कसे असतील यासाठी हवामान विभागाने मुंबईत उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Maharashtra Rains: गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुरामुळे 120 गावांचा संपर्क तुटला

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासुन मुसळधार पाऊस सुरू असून गडचिरोली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली असून तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या काही तासांपासून न थांबता सुरू असलेल्या पावसामुळे तुळशी तलाव ओसांडून वाहत आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणारा तुळशी तलाव शनिवारी सकाळी साडे आठ वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे.