Building Collapses In Mohali (फोटो सौजन्य - PTI)

Building Collapses In Mohali: पंजाब (Panjab) मधील मोहाली (Mohali) येथे सहा मजली इमारत कोसळल्याची (Building Collapses) धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या तळमजल्यावर जिम होती. ढिगाऱ्याखाली चार जण गाडले गेल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जवळच्या इमारतीत खोदकाम सुरू होते. त्यामुळे इमारत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

या घटनेचा व्हिडिओ आला समोर -

अपघात स्थळाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये जेसीबी मशिन घटनास्थळी दिसत असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. आजूबाजूला मोठी गर्दी जमली आहे. मोहालीचे एसएसपी दीपक पारीक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, इमारत कोसळल्याची बातमी मिळाली आहे. ढिगाऱ्याखाली कितीजण गाडले गेले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. (हेही वाचा -Bhendi Bazaar Building Collapse: भेंडी बाजार येथे रिकामी इमारत कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही; सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर)

घटनास्थळी बचावकार्य सुरू -

घटनास्थळी NDRF टीम, JCB मशीनच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी जनताही सहकार्य करत आहे. आत कोणी अडकले असेल तर त्याला बाहेर काढले जाईल. लवकरच सर्व काही स्पष्ट होईल. इमारत कोसळण्याचे तांत्रिक कारण नंतर समजेल, असंही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. (हेही वाचा - Noida Bahlolpur Building Collapse: नोएडामध्ये पाया खोदताना 3 मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता, बचावकार्य सुरू (Watch Video))

अद्याप अपघातात कोणतीही जीवितहानी नाही -

प्राथमिक माहितीनुसार, जवळच तळघर खोदले जात असताना इमारत कोसळली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सोहना गावचे माजी सरपंच परविंद सिंग सोहना यांनी सांगितले की, इमारतीच्या खालच्या मजल्यावर जिम असून घटनेच्या वेळी काही तरुण जिममध्ये होते. अद्याप अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.