Noida Bahlolpur Building Collapse: नोएडामध्ये पाया खोदताना 3 मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता, बचावकार्य सुरू (Watch Video)

या घटनेत अनेक जण अडकल्याचा संशय आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचे पथक आणि इतर मदत पथके हजर आहेत. सर्वजण इमारतीचा ढिगारा हटवण्यात व्यस्त आहेत. इमारतीजवळच पाया खोदला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Noida Bahlolpur Building Collapse: नोएडामध्ये पाया खोदताना 3 मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता, बचावकार्य सुरू (Watch Video)
Noida Bahlolpur Building Collapse (फोटो सौजन्य - X/@tricitytoday)

Noida Bahlolpur Building Collapse: नोएडातील बहलोलपूर गावात (Bahlolpur Village) तीन मजली इमारत कोसळल्याची (Building Collapse) धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारत कोसळल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक जण अडकल्याचा संशय आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचे पथक आणि इतर मदत पथके हजर आहेत. सर्वजण इमारतीचा ढिगारा हटवण्यात व्यस्त आहेत. इमारतीजवळच पाया खोदला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण सेक्टर 63 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी सेक्टर 63 पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान मंदिराजवळ बहलोलपूर येथे एका मोकळ्या भूखंडाचा पाया खोदला जात होता. दरम्यान, पाया खोदत असताना बाजूच्या घराची भिंत कोसळली. ढिगाऱ्याखालून दोन जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा -Karnataka Building Collapse: कोलारच्या बांगारापेट शहरात नूतनीकरणादरम्यान 3 मजली इमारत कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video))

नोएडामध्ये पाया खोदताना 3 मजली इमारत कोसळली, पहा व्हिडिओ - 

इमारत कोसळल्यानंतर आरडाओरडा झाला. इमारतीतील लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. बुलडोझरच्या सहाय्याने ढिगारा हटवला जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2024 07:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).