Mukesh Ambani to Shift to London: भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार मुकेश अंबानी व कुटुंब; 300 एकरमध्ये 49 हून अधिक खोल्यांचे अलिशान घर तयार- Reports
Mukesh Ambani (Photo Credits: File Image)

रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता भारत सोडून लंडनमध्ये (London) राहणार आहेत. मिड-डेच्या वृत्तानुसार, अंबानी लंडनच्या स्टॉक पार्कमध्ये असलेल्या बकिंगहॅमशायरमधील (Buckinghamshire) 300 एकरच्या मालमत्तेत शिफ्ट होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांचे ब्रिटनमधील आलिशान घर पूर्ण झाले आहे. त्यांनी स्टोन पार्कमध्ये 592 कोटी रुपयांमध्ये एक आलिशान घर तयार केले असून त्यात 49 हून अधिक खोल्या आहेत.

तसेच याठिकाणी स्विमिंग पूल, मिनी हॉस्पिटल, क्लब, ऑडिटोरियम, पार्क, ओपन एरिया आहे. घरासाठी वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे. हे आलिशान घर 300 एकरपेक्षा जास्त जागेत तयार करण्यात आले आहे. घरात विशेष मंदिराची स्थापना केली आहे. अशाप्रकारे अंबानींनी या वर्षाच्या सुरुवातीला 592 कोटी रुपयांना विकत घेतलेली लंडनची मालमत्ता त्यांनी आपले मुख्य घर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीसाठी अंबानी कुटुंब त्यांच्या नवीन घरी होते. अंबानी कुटुंब सहसा अँटिलियामध्येच दिवाळी साजरी करतात.

आता दिवाळी साजरी केल्यानंतर ते भारतात परततील आणि पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये यूकेला जातील. अंबानी कुटुंबाने गेल्या वर्षी त्यांच्या नवीन घराचा शोध सुरू केला होता आणि स्टॉक पार्क मॅन्शनचा करार अंतिम केल्यानंतर, ऑगस्टमध्ये 300 एकर मालमत्तेचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले. हे घर पूर्वी खाजगी निवासस्थान होते. 1908 नंतर त्याचे कंट्री क्लबमध्ये रूपांतर झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे जेम्स बाँड चित्रपटाचे शूटिंगही झाले होते. (हेही वाचा: Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी घ्या जाणून)

मात्र अंबानी कुटुंब लंडनला जाण्याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून कोणतीही माहिती समोर आली नाही. मुकेश अंबानी यांचे कुटुंब गेल्या अडीच महिन्यांपासून मुंबईबाहेर आहे. त्यामुळेच अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कोविड लॉकडाऊनदरम्यान 4 लाख स्क्वेअर फुटांमध्ये असलेल्या अँटिलियामध्ये अंबानी कुटुंब कैद होते. त्यावेळी एका मोकळ्या जागेत अजून एखादे घर असावे असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी लंडनच्या मालमत्तेचा विचार केला. लॉकडाऊन दरम्यान कुटुंबाने जामनगरमध्येही बराच वेळ घालवला. जामनगरमध्ये त्यांची रिफायनरी आहे, जी जगातील सर्वात मोठी आहे.