मुंबई शेअर बाजाराचा मुकेश अंबानीं च्या रिलायन्स जिओला फटका
Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

भारतातील अग्रगण्य कंपनी रिलायन्स जिओला (Reliance Jio) मुंबई शेअर बाजाराचा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांत किरकोळ घसरुन होऊन 38 अंकांची घसरण होऊन दिवसाअखेरीस तो 41,642 वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 9 अंकांची किरकोळ घसरण होऊन त्याने 12,262 चा स्तर गाठला. याचा फटका रिलायन्स जिओला बसला असून ही कंपनी आर्थिक संकटांत येण्याची शक्यता आहे.मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या इंधन शुद्धीकरण व्यवसायातील 20 टक्के हिस्सा सौदी अरामको कंपनीस 15 अब्ज अमेरिकी डॉलरला विकण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्सच्या या निर्णयास केंद्र सरकारने न्यायालयात आव्हान दिले असून हा व्यवहार रोखण्याची विनंती केली आहे. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या प्रिपेड ग्राहकांना दरवाढीचा फटका; 3 डिसेंबर पासून लागू होणार नवे दर

या घडामोडींचा परिणामही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाला व त्यांनी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वधारलेला हा समभाग विकून कमाई करण्याचा मार्ग पत्करला. यामुळे रिलायन्सच्या समभागमूल्यात 1.78 टक्क्यांची घसरण झाली. बाजाराचे नेतृत्व करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची जोरदार विक्री करून गुंतवणूकदारांनी नफेखोरीस प्राधान्य दिले.

अलीकडेच रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केला आहे. मात्र जिओच्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली नाही आहे. त्यामुळे प्लॅनच्या किंमती वाढवण्यापेक्षा सर्वात स्वत असा 49 रुपयांच्या प्लॅन हटवला असून त्याची सुरुवाती किंमत 75 रुपये ठेवण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वीच जिओने त्यांच्या युजर्ससाठी ऑल-इन-वन प्लॅन उपलब्ध करुन दिला होता. तर 75 रुपयांचा प्लॅन हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. टेलिकॉमटॉक यांच्या रिपोर्टनुसार, 75 रुपयांच्या प्लॅनसह 99 रुपये, 153, 297 आणि 594 रुपयांसह दुसरे प्लॅन ही उपलब्ध आहेत. त्याचसोबत युजर्सला नॉन-जिओसाठी अतिरिक्त IUC टॉप-अप रिचार्ज करावा लागणार आहे.