जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबांनी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड (Reliance Industry Limited) 9 लाख करोड रुपयांची पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रिने मोठा विक्रम मोडीत काढल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी कंपनीच्या व्यवसायात 2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानुसार कंपनीचे शेअर 1,423 रुपयांवर पोहचले. रिलायन्स इंडस्ट्रिच्या शेअर्सनी जानेवारी ते आतापर्यंत 26 टक्क्यांनी उच्चांक गाठले आहे. तर आता गुंतवणूकदारांना कंपनीच्या सप्टेंबर महिन्याच्या रिजल्टची वाट पाहत असून ते आज संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होणार आहेत.
आज रिलायन्स कंपनीचा व्यवहार शेअर मार्केटसाठी सकारात्मक दिसून आला. त्यामध्ये बीएसई 200 अंकांनी उच्चांक गाठत 39,252 अंकांवर पोहतला. कंपनीला आता सप्टेंबर महिन्याचा निकालही सकारात्मक येईल अशी आशा आहे. एका रिपोर्टनुसार 14 पैकी 10 अॅनालिस्टिट यांचे असे म्हणणे आहे की, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे नेट प्रॉफिट 11,265 करोड रुपयांवर पोहचणार आहे.दुसऱ्या बाजूला 9 अॅनालिसिस्ट यांच्या मते, कंपनीचे उत्पन्न 1.51 हजार अरबवर पोहचणार आहे. रिलायन्सच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, रिलायन्सच्या तिमाही दरम्यान बरीच वाढ होण्याची शक्यता आहे. जिओच्या एआरपीयूत थोड्या प्रमाणात घट दिसून येईल पण युजर्सची वाढती संख्येमुळे कंपनीच्या उत्पन्नात फारसा फरक दिसून येणार नाही.(अभिमानास्पद! जगातील नामांकित कंपन्यांमध्ये Infosys तिसऱ्या स्थानी; टॉप 250 मध्ये भारतातील 17 कंपन्या, पहा यादी)
तर बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच यांच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स ही पहिलीच भारतीय कंपनी आहे ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन गेल्या दोन वर्षात 200 अरब डॉलर होईल. 2018 मध्ये आठ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाच्या पातळीला स्पर्श करणार्या रिलायन्सने देशातील पहिल्या कंपनीचा विक्रम गाठला होता.आयओसी यांनी 31 मार्च 2019 ला आर्थिक वर्षाच्या समाप्तीवेळी 6.17 लाख करोड रुपयांचा व्यवसाय केला. तर रिलायन्स यांनी आयओसी यांच्या दुप्पट उत्पन्न कमवत देशातील सर्वात मोठी नफा मिळवणारी कंपनी ठरली आहे.