आमदाराच्या मुलीला थार लवकरात लवकर डिलिव्हरी करण्यासाठी खासदार सनी देओल यांची चक्क डीलरला पत्र
सनी देओल (Photo Credits: Instagram)

गुरुदासपुर येथील भाजपचे खासदार सनी देओल हे गेल्या काही काळापासून आपल्या लोकसभा क्षेत्रात दिसून येत नाही आहेत. मात्र महिंद्रा कंपनीच्या डीलरला त्यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यात असे म्हटले की, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सुजनापूर येथील आमदार दिनेश कुमार बब्बू यांच्या मुलीला थार गाडीची डिलिव्हरी करावी. सनी देओल द्वारे लिहिण्यात आलेली ही चिठ्ठी आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.(India Independence Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर 8व्यांदा ध्वजारोहण, वाचा भाषणातील ठळक मुद्दे)

या बद्दल लोकांनी सनी देओल याच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. खरंतर सनी देओल द्वारे लिहिण्यात आलेली ही चिठ्ठी या वर्षातील 12 फेब्रुवारी 2021 रोजीची आहे. सुत्रांनुसार, थार गाडीची बुकिंग केल्यानंतर ती सहा महिन्यांनी डिलिव्हर केली जात आहे. मात्र आमदाराच्या मुलीला लवकरात लवकर ती गाडी हवी होती म्हणून सनी देओल यांनी महिंद्रा कंपनीला थार लवकरच डिलिव्हरी करावी अशी चिठ्ठी लिहिली आहे.

जेव्हा सनी देओलचे पीए पंकज जोशी यांच्यासोबत याबद्दल बातचीत केली असता त्यांनी असे म्हटले की, आमदाराच्या मुलीला गाडी घ्यायची होती. यासाठी अजून काही लागल्यास आमदाराने त्याचे सुद्धा पत्र दिले होते. त्यांनी पुढे असे म्हटले की, पत्र फेब्रुवारी महिन्यातील आहे. जेव्हा ही चिठ्ठी लिहिली आहे तेव्हा गाडी सुद्धा घेतली नव्हती. ही चिठ्ठी रद्द केली असून आता 6 महिन्यानंतर छेड काढण्याच्या कारणास्तव व्हायरल करण्यात आली आहे. पंकज जोशी यांनी असे ही म्हटले की, चिठ्ठी व्हायरल तर झाली आहे पण ते नाही सांगणार की सुजनापूरला सनी देओल यांच्या द्वारे 1 कोटी रुपयांचा फंड सुद्धा दिला गेला आहे.(Monsoon Session of Parliament 2021: राहुल यांना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा- रामदास आठवले)

दरम्यान दिनेश खोसला, संजीव कुमार आणि नरिंदर कुमार नावाच्या तरुणांनी असे म्हटले की, ही एक उत्तम बाब आहे. सनी देओल यांनी गुरुदासपूरला लक्षात ठेवले. त्यांनी असे म्हटले की,  आम्ही सनी देओल यांना लोकसभेत खासदार म्हणून पाठवले होते आणि आमची अपूर्ण कामे ते पूर्ण करतील. मात्र जेव्हा पासून ते खासदार झाले आहेत, गुरुदासपूर, बटाला आणि पाठनकोट येथील लोकांना एकदा सुद्धा भेटण्यासाठी आले नाही. कोविडच्या दरम्यान सुद्धा सनी देओल यांनी लोकांच्या स्थितीबद्दल विचारले नाही. पुढे असे ही त्यांनी म्हटले की, सनी देओल यांनी लोकांसाठी काही केले नाही. पण त्यांनी आमदाराच्या मुलीबद्दल जरुर विचारले.  खासदारांनी कधीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत शेतकऱ्यांबद्दल काही बातचीत केली नाही.