MP Prajwal Revanna: माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने कर्नाटकात खळबळ,  चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना

कर्नाटकातील जनता दलाचे Janata Dal (Secular) खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना (MP Prajwal Revanna) यांच्यावर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर कर्नाटक सरकारने एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली आहे. दुसरीकडे, प्रज्वल रेवन्ना यांनी व्हायरल व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्यांनीही तक्रार दाखल केल्याची चर्चा सुरु असतानाच आता देश सोडून जर्मनीला गेल्याची चर्चा आहे.  रेवन्ना हे माजी पंतप्रधान आणि JD(S) प्रमुख एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.  (हेही वाचा - UP Horror: लग्नासाठी राजी न झाल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीला 3 दिवस ओलीस ठेवून केला बलात्कार, गरम लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण)

खासदार आणि एनडीएचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांनी शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच आरोप आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी प्रज्वल यांच्यावरील आरोपांबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले होते. यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

कर्नाटक सरकारने खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा समावेश असलेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विटवर एका पोस्टमध्ये सांगितले की, "सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडीओ क्लिप फिरत आहेत, जिथे महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते, असे मुख्यमंत्री म्हणाले.