MP Arvind Dharmapuri Controversial Statement: 'गिधाडाच्या मृत्यूची वेळ येते तेंव्हा...', भाजप खासदार अरविंद धर्मपुरी यांचे वादग्रस्त विधान
Arvind Dharmapuri | (Photo Credit -ANI / Twitter)

गिधाडाच्या मृत्यूची वेळ येते तेव्हा ते शहराकडे धाव घेते. जेव्हा केसीआर (KCR) यांच्या राजकीय मृत्यूची वेळ येते तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी पंगा घेता आणि मोदी सरकारशी खोटे बोलतात, असे विधान भाजपचे निजामाबाद येथील खासदार (BJP's Nizamabad MP) अरविंद धर्मपुरी (Arvind Dharmapuri) यांनी केले आहे. आपल्या विधानामुळे अरविंद धर्मपूरी जोरदार चर्चेत आले आहेत. त्यांच्या विधानावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अरविंद धर्मपुरी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांच्याबद्दल बोलत होते.

खासदार अरविंद धर्मपूरी यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्याबाबत बोलताना हे विधान केले आहे. अरविंद धर्मपूरी हे तेलंगणा सरकारच्या दलित बंधू (Dalit Bandhu Scheme योजनेवर भाष्य करत होते. यावेळी त्यांची जीभ घसरली. सरकारकडे या योजनेसाठी पुरेसे पैसे नाहीत त्यामुळेच ही योजना थांबविण्यात आल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. (हेही वाचा, Samajwadi Perfume: उत्तर प्रदेशच्या राजकारणात हटके फाया, अखिलेश यादव यांच्याकडून 'समाजवादी अत्तर' लॉन्च)

पत्रकार परिषदेत बोलताना, अरविंद म्हणाले, "मुख्यमंत्री केसीआर यांनी दलित बंधू योजना थांबवली कारण दलितांना पैसे देण्यासाठी राज्याच्या कोषागार खात्याकडे पैसे नाहीत. प्रशासनातीलच काही लोकांकडून मला कळले आहे की अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणतात या योजनेची अंमलबजावणी करणे अशक्य आहे.

एएनआय ट्विट

दलित बंधू योजना हा तेलंगणा सरकारने सुरू केलेला एक प्रमुख कार्यक्रम आहे. ही एक कल्याणकारी योजना आहे ज्याचा उद्देश राज्यातील दलितांच्या कल्याणासाठी सक्षम करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आहे. अरविंद यांनी या वेळी काँग्रेस पक्षावरही टीका केली. ते म्हणाले, "काँग्रेसला तेलंगणाच्या हिताची खरोखरच चिंता असेल तर त्यांनी पंजाबप्रमाणेच येथे दलित उमेदवाराला मुख्यमंत्री म्हणून उभे केले पाहिजे.