Navi Mumbai Shocker: नवी मुंबईतील कामोठे (Kamothe) येथील 70 वर्षीय महिला आणि तिच्या 45 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी (New Mumbai Police) गुरुवारी दोन 19 वर्षीय तरुणांना अटक (Arrest) केली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गीता भूषण जग्गी आणि त्यांचा मुलगा जितेंद्र बुधवारी ठाण्यातील सेक्टर 6 भागात त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आमच्या तपासात असे आढळून आले की, जितेंद्रसोबत दोन व्यक्ती निवासी संकुलात आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी 70 वर्षीय महिला आणि तिच्या मुलावर हल्ला करून त्यांची हत्या (Murder) केली. संज्योत मंगेश दोडके आणि सुभम महिंद्रा नारायणी असं या दोन आरोपींचं नाव आहे. दोन्ही आरोपी उलवे येथील रहिवाशी आहेत.
गळा दाबून केली हत्या -
प्राप्त माहितीनुसार, हे दोघे जितेंद्रच्या ओळखीचे होते. जितेंद्रने त्यांना 31 डिसेंबरच्या रात्री पार्टीसाठी बोलावले होते. मद्यपान केल्यानंतर जितेंद्रने दोन्ही आरोपींकडे लैंगिक अत्याचार केले. यामुळे संतापलेल्या दोघांनी जितेंद्रवर एक्स्टेंशन बोर्डने हल्ला केला. त्यानंतर त्यांचा गळा दाबून खून केला. (हेही वाचा - Satish Wagh Murder Case: प्रेम प्रकरणातून बायकोनेचं दिली सुपारी अन् केला खून; सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंतचा मोठा खुलासा)
आरोपींनी जितेंद्रचा मोबाईल, पाकीट हिसकावून नेले -
आरोपींनी जितेंद्रचा मोबाईल, पर्स, टॅब आणि दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांपेक्षा कमी कालावधीत या खुनाचा छडा लागला. प्राप्त माहितीनुसार, जितेंद्रचे नातेवाईक बुधवारी संध्याकाळी घरी आले होते. मात्र, त्यांना जितेंद्रच्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. तसेच आई आणि मुलाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा - Kalyan Girl Rape-Murder Case: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम न्यायालयात बाजू मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती)
आई आणि मुलगा आढळला मृतावस्थेत -
दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घरात घुसले असता त्यांना गॅसचा नॉब चालू असल्याचे दिसले. तसेच महिला आणि तिचा मुलगा बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळले. या संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.