Representational image of a housing society (Photo Credits: IANS)

देशातील टॉप 8 शहरांमध्ये अहमदाबादमध्ये (Ahmedabad) राहण्यासाठी सर्वात परवडणारी घरे (Most Affordable Homes) आहेत. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाइट फ्रँकने जारी केलेल्या परवडणाऱ्या शहरांच्या निर्देशांकात हा दावा करण्यात आला आहे. हा निर्देशांक शहरातील घरे आणि इतर संसाधनांच्या परवडण्यावर आधारित आहे. हे मासिक हप्ते आणि कुटुंबाच्या सरासरी उत्पन्नाच्या गुणोत्तरावर मोजले जाते. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसारदेखील, अहमदाबाद हे सर्वात आर्थिकदृष्ट्या परवडणारे शहर ठरले होते.

यावर्षीच्या म्हणजेच 2023 च्या आतापर्यंतच्या सहा महिन्यांच्या मूल्यांकनात, अहमदाबादचा परवडणारा निर्देशांक सर्वात कमी, 23 टक्के नोंदवला गेला. त्यानंतर  पुणे आणि कोलकाताचा नंबर लागतो. दोन्ही शहरानाचा परवडणारा निर्देशांक 26  टक्के या निर्देशांकात देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 55 टक्के आहे. म्हणजेच मुंबई शहर हे घरे आणि इतर सुविधांच्या खरेदीच्या बाबतीत खूप महाग आहे. यानंतर राजधानी दिल्लीचा निर्देशांक 30 टक्के आणि हैदराबादचा परवडणारा निर्देशांक 31 टक्के आहे.

निर्देशांकानुसार, देशातील आठ प्रमुख परवडणाऱ्या शहरांमध्ये अहमदाबाद प्रथम, कोलकाता द्वितीय, पुणे तिसरे, चेन्नई चौथ्या, बेंगळुरू पाचव्या, दिल्ली सहाव्या, हैदराबाद सातव्या आणि मुंबई आठव्या क्रमांकावर आहे. निर्देशांकानुसार, अहमदाबादमध्ये सर्वात स्वस्त घरांची बाजारपेठ आहे. परवडण्यायोग्यता निर्देशांक एखाद्या विशिष्ट शहरातील गृहनिर्माण युनिटच्या समान मासिक हप्त्याच्या (EMI) निधीसाठी कुटुंबाला आवश्यक असलेल्या उत्पन्नाचे प्रमाण दर्शवतो. (हेही वाचा: SBI To Open 300 Branches: एसबीआय सध्याच्या आर्थिक वर्षात 300 नव्या ब्रांच सुरू करणार)

दुसरीकडे, अॅनारॉकच्या (ANAROCK) अहवालात गेल्या 5 वर्षांत देशातील 7 शहरांमध्ये सरासरी फ्लॅटच्या आकारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच येथे बांधलेल्या फ्लॅटचा आकार पूर्वीपेक्षा वाढला आहे. मात्र मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) हे एक असे शहर आहे, जिथे फ्लॅटचा आकार मोठ्या प्रमाणात कमी होत चालला आहे. यासह चेन्नई शहरात मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फ्लॅट्सचा आकारात घट नोंदवली आहे.